मुंबईतील लोकल व बससेवा बंद करणार नाही : मुख्यमंत्र्यांची घोषणा
uddahv thackray

मुंबईतील लोकल व बससेवा बंद करणार नाही : मुख्यमंत्र्यांची घोषणा

.....

पुणे : मुंबईतली उपनगरी लोकल रेल्वे सुरू राहणार असून, मुंबईकरांना अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या अधिकारी-कर्मचारी वर्गाच्या प्रवासासाठी लोकल आणि बससेवा हाच पर्याय असल्याने ती बंद करता येणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. बंद असलेली दुकाने सुरू करू नये,असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

कोरोनाच्या प्रादुर्भावावर मुख्यमंत्र्यांनी आज जनतेशी संवाद साधला. मुंबईत लोकलमधून रोज साधारपणे 80 ते 81 लाख लोक प्रवास करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही संख्या 20 ते 30 टक्के कमी झाली आहे. तरीही प्रवाशांची संख्या 50-55 लाख रुपर्यांत आहे. दुसरीकडे, मुंबईसह राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोकल, बस आणिक्ष इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याची मागणी होत आहे. परंतु, सरकार आणि महापलिकेतील अत्यावश्‍य सेवा पुरविणाऱ्या विभागातील कर्मचारी-कमगारांच्या सोयीसाठी लोकल बंद करणे योग्य राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अन्य बाबीसंदर्भात राज्य सरकार गंभीर असून, त्यातून जीवनावश्‍यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्यात येत आहेत. गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाय करण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांत गर्दी होत असल्याचे जाणवले आहे. या पुढील काळातही लोकांनी सहकार्य करावे.
राज्य पसरण्याची भीती असलेल्या कोरोनाला थोपविण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दुसऱ्याशी दिवशी लोकांशी संवाद साधला. खासगी क्षेत्रासह सरकारी, निमसरकारी कार्यालयातील कामकाजावर बंधने घालण्यात येत आहेत. मात्र आवश्‍यक त्या सेवा-सुविधा सुरूच राहणार आहेत. ""लोकांनी अजिबात घाबरू नये. मात्र, कोणत्याही कारणांसाठी घराबाहेर पडू नये,'' असेही ठाकरे यांनी सांगितले.

इतर महत्त्वाचे मुद्दे

 -25 टक्के कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय काम
- जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व गोष्टी मुंबई, पुणे, नागपूर आणि पिंपरी चिंचवड मध्ये बंद
- वर्क फ्रॉम होम कंपनीने केले नाही तर नाईलाजास्तव बंद करणार
- आर्थिक संकटात मार्ग काढण्यासाठी प्रयत्न
- मुंबई मधीलबस आणि लोकल सेवा बंद करणार नाही

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in