`कॅमेऱ्यासोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स असणे गरजेचे!` - Shetaji teaches how to sell unsuccess criticizes Rohini Khadase | Politics Marathi News - Sarkarnama

`कॅमेऱ्यासोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स असणे गरजेचे!`

कैलास शिंदे
मंगळवार, 8 जून 2021

रोहिणी खडसेंच्या राजकीय काॅमेंट चर्चेत 

जळगाव : कान टोचल्यानंतर अपयश कसं विकता येत हे काल शेठजींनी शिकविले अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी हल्लाबोल केला आहे. (Rohini Khadase criticizes Modi)

रोहिणी या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत .तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत. सद्या त्या भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करीत असतात. त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात, ट्विटर च्या  माध्यमातून त्या भाजपवर टीका करत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशात मोफत लसीकरण करण्याची घोषणा काल केली. त्यावर खडसे यांनी हे वक्तव्य केले आहे.  सर्व नागरिकांना लस देण्याची जबाबदारी राज्याची नव्हे तर केंद्राची आहे असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले होते. त्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली, असे सांगत खडसे यांनी ही टीका केली. कान टोचल्याबद्यल सर्वोच्च न्यायालयाचे आभार, असेही त्यांनी म्हटले आहे..
याशिवाय आधीच्या टि्वटटमध्ये लेन्सता कॅमेरा घेऊन आपला फोटो टाकला आहे, यात त्यांनी म्हटले आहे की कॅमेरा सोबत लेन्स आणि माणसाकडे सेन्स असणं खूप गरजेचं असतं. जवळच व लांबच दिसण्यासाठी, असे म्हटले आहे. 

त्यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. एकाने म्हटले आहे की महागडी लेन्स गरिबांना परवडत नाहीत आणि नेत्यांकडे असून त्यांना त्याचा फायदा नाही...खडसेंना तरी दूरचं कुठं दिसलं ??

उशीर लागला जवळच अन लांबच नीट समजण्यासाठी पण सेन्स असल्याने नुकसानीपेक्षा फायदाच जास्त झाला, अशीही प्रतिक्रिया एकाने दिली आहे. 

रोहिणी खडसे यांचे समज“ कमी असेल तर.. “गैरसमज“ व्हायला वेळ लागत नाही, या ट्विटवरपण भरपूर प्रतिक्रिया आल्या आहेत.  

वाचा ही बातमी : शिवसेनेच्या वर्धापनदिनी खैरे आणि दानवे यांच्यातील रुसवा कायम

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख