महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात शाब्दिक फवारणी!

महापौरांच्या या पत्रावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तत्काळ स्पष्टीकरण दिले. महानगरपालिका जबाबदारीने आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी हे निर्जंतुकीकरण करीत आहे, असा दावा केला.
sandeep joshi-tukaram mundhe
sandeep joshi-tukaram mundhe

नागपूर : महापौर संदीप जोशी यांनी काल आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र देत शहरातील अनेक भागांत अद्यापही योग्य प्रकारे फॉगींग आणि फवारणी होत नसल्याचा आरोप केला होता. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांचा आरोप खोडून काढत महापालिकेडून जबाबदारीने नागरिकांच्या आरोग्यासाठी निर्जंतुकीकरण करीत असल्याचे स्पष्ट केले. 

महापौर संदीप जोशी यांनी काल, बुधवारी आयुक्तांना पत्र दिले. त्यात त्यांनी प्रत्येक भागात फवारणी तसेच डासांच्या वाढत्या संख्येमुळे नियमित फॉगिंग करण्याचे मागील सात दिवसांपूर्वीच दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. अनेक छोट्या वस्त्यांमध्ये अद्यापही कोणतीही व्यवस्था केली जात नसल्याचे महापौरांनी नमुद केले होते.

महापौरांच्या या पत्रावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तत्काळ स्पष्टीकरण दिले. महानगरपालिका जबाबदारीने आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी हे निर्जंतुकीकरण करीत आहे. निर्जंतुकीकरणासंदर्भात शासनाचे काही दिशानिर्देश आहेत. त्याच पद्धतीने हे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची चमू कार्यरत आहे. सोडियम हायपोक्‍लोराईडचा वापर निर्जंतुकीकरणासाठी करण्यात येत आहे, असे आयुक्तांनी नमुद करीत महापौरांचे आरोप खोडून काढले.

शहरात अग्निशमन गाड्या आणि हॅण्ड स्प्रेच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. हे निर्जंतुकीकरण केवळ आणि केवळ मनपाच्या कर्मचाऱ्यांकडूनच करण्यात येत असल्याचे त्यांनी नमुद केले.

स्वयंस्फूर्तीने फवारणी करणाऱ्यांना इशारा
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कुणीही निर्जंतुकीकरण फवारणी करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. स्वयंसेवी संस्था किंवा नागरिकांनी स्वत: अशा प्रकारचे निर्जंतुकीकरण करु नये, शासनाचे दिशानिर्देश पायदळी तुडविल्यास कठोक कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. आवाहन त्यांनी केले.

शहरातील काही भागांत काही स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिकांकडून भीतीपोटी किंवा समाजकार्य करण्याच्या उद्देशाने निर्जंतुकीकरणासाठी पावले उचलली जात आहे. अपुऱ्या माहितीचा आधार किंवा गैरसमजातून कुठल्याही मिश्रणातून निर्जंतुकीकरण केल्यास इतर नागरिकांच्या आरोग्याला अपाय होण्याची शक्‍यता आहे. महापालिका प्रामाणिकपणे निर्जंतुकीकरण करीत आहे, असे
मुंढे यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com