गुरुजी, गरिबांच्या पोरांना तुमच्या पोरासारखं शिकवा !

.
ghodele_
ghodele_

औरंगाबाद : एकीकडे खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळत नाही अशी स्थिती आहे तर दुसरीकडे विद्यार्थी नाहीत म्हणून औरंगाबाद महापालिकेच्या शाळा ओस पडण्याची वेळ आली आहे.

कुठे विद्यार्थी नाहीत तर कुठे शिक्षक नाही त्यामुळे गुणवत्तेचे तीन तेरा. आता यावर जालीम उपाय म्हणून औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी थेट आपल्याच दालनात महापालिकेच्या सर्व शाळांचे केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांची शाळा भरवली. या शाळेत थेट आदेश दिला, 'गुरुजी, गरिबांच्या पोरांना तुमच्या पोरासारखं शिकवा'. 

औरंगाबाद महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था दयनीय झाली आहे. महानगरपालिकेच्या काही शाळांमध्ये विद्यार्थी आहेत तर शिक्षक नाहीत आणि काही शाळांमध्ये शिक्षक आहेत तर विद्यार्थी नाहीत अशी स्थिती आहे.

त्याशिवाय गुणवत्ता नसल्याने पालकांनी आपल्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत पाठवणं बंद केलं आहे. त्यामुळे आज महापौर नंदकुमार घोडेले यांनी थेट केंद्र प्रमुख,  मुख्याध्यापकांची शाळाच महापालिकेत भरवली.

मुख्याध्यापकांना यावेळी त्यांनी चांगलेच सुनावले. ज्या शाळेत शिक्षक नाहीत त्या शाळेतील मुलं जवळच्या महापालिका शाळेत पाठवा, गरिबांच्या मुलांनाही तुमच्या मुलांसारखे शिकवा असे आदेश त्यांनी यावेळी केले.

महापालिकेच्या एकेक शाळा विद्यार्थी नसल्यामुळे बंद कराव्या लागत आहेत. बंद झालेल्या शाळेच्या इमारती खासगी संस्थांकडून गिळून टाकण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षांपासून समोर येत आहेत.

मागच्या दोन वर्षात विद्यार्थी आणि शिक्षक नसल्यामुळे ओस पडलेल्या महानगरपालिकेच्या शाळांच्या इमारती या खासगी संस्थेच्या शाळांना दिल्या गेल्या. तुटपुंज्या भाडेतत्त्वावर या इमारती 'लीज'वर दिल्या गेल्या.

त्याठिकाणी खाजगी संस्थानी शाळा सुरू करून हजारो रुपये फीस घेऊन गरिबांच्या पोरांना तीच दारं शिक्षणा साठी उघडी करून दिली. आता असे प्रकार होऊ नये यासाठी स्वतः महापौर नंदकुमार घोडेले प्रयत्न करणार असे सांगितले. मात्र, आज चक्क राजकीय नेत्यांनी तेही थेट महापौरांनी मुख्याध्यापकांची आणि केंद्र प्रमुखांची शाळा भरवल्याने तेही विद्यार्थ्यासारखेच भांबावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com