mayor mukta tilak and mp chavan enjoy ramp walk | Sarkarnama

महापौर मुक्ता टिळक आणि खासदार वंदना चव्हाण अवतरल्या `रॅम्प वाॅक` वर

ज्ञानेश सावंत
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

पुणे : राजकीय पटलावर प्रतिस्पर्ध्यांना चितपट करणाऱ्या, मुरलेल्या राजकारणी आणि प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्षाची तयारी ठेवणाऱ्या पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण या चक्क "रॅम्प'वर उतरल्या आणि भल्याभल्या मॉडेलना लाजवेल, असा "रॅम्पवॉक'ही त्यांनी केला.

राजकारणात राहूनही आपल्या धाटणीत राहणाऱ्या महापौर टिळक आणि खासदार चव्हाण यांनी "रॅम्प'वर दिलेल्या "पोज'ने उपस्थितांची मने जिंकली. आपल्याच वरिष्ठ सहकाऱ्यांचा "रॅम्प'वरील उत्साह पाहून सर्वपक्षीय महिला नेत्यांनी त्यांना उत्स्फूर्तपणे दाद दिली. 

राजकारणातील रोजच्या धावपळीतून वेगळा अनुभव यावा, या उद्देशाने "सकाळ माध्यम समूहा'च्या "तनिष्का' मासिकाने पुण्यातील आमदार, खासदार आणि नगरसेविकांसाठी खास "रॅम्पवॉक'चे व्यासपीठ खुले केले होते. त्याला निमित्त होते, "तनिष्का' दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे!

विशेष म्हणजे, हा कार्यक्रम कसा असेल, याची पुसटशीही कल्पना या नेत्यांना दिली नव्हती. नेहमी सारखी राजकीय सभा, मेळावे, आंदोलने आणि भाषणांपासून लांब असलेल्या आणि तब्बल चार तास रंगलेल्या कार्यक्रमात महिला नेत्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

रॅम्पवर आल्यानंतर शहरविकासाच्या कल्पना मांडतानाच, आपल्या आवडी-निवडी, स्वभाव या नेत्या मोकळेपणाने मांडत होत्या. तेव्हा, अनेकजणींना राजकारणापलीकडची महिलाही जाणून घेता आली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, उपस्थितांना उत्सुकता होती, महापौर टिळक आणि खासदार चव्हाणांच्या "वॉक'ची. नगरसेविका सुजाता शेट्टी "रॅम्प'च्या दिशेने येताच, चव्हाण या स्वत: त्यांच्यासोबत निघाल्या. मात्र, माजी नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरेंनी महापौर आणि खासदारांनी एकत्र "रॅम्प वॉक' करावा, अशी मागणी केली. तेव्हा महापौर आणि खासदार एकत्र आल्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

त्याआधी नगरसेविका अश्विनी कदम आणि चव्हाण यांच्या कन्या दिव्या चव्हाण याही "रॅम्प'वर आल्या. पाठोपाठ ज्येष्ठ नगरसेविका लता राजगुरू, महिला व बाल्यकल्याण समितीच्या अध्यक्ष राजश्री नवले यांनी सगळ्याजणींचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्री नुपूर दैठणकर आणि अश्विनी कुलकर्णी यांनी "परफॉर्मन्स' केला.
 
महापौर टिळक म्हणाल्या, "राजकारणात असल्याने अशा "इव्हेंट'ला उपस्थित राहाणे शक्य होत नाही. पण आज माझ्या सहकारी नगरसेविकांना "रॅम्प'वर पाहून आनंद झाला. हा कार्यक्रम आमच्याकरिता आनंददायी ठरला.'' 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख