vishvanath_mahadeshwar
vishvanath_mahadeshwar

महापौर महाडेश्वरांनी घेतली मोबाईल फोनची धास्ती !

.

मुंबई : महापौरांनी भेटायला येणार्‍यांना दालनाबाहेर मोबाईल फोन ठेवूनच आतमध्ये प्रवेश दिला जावा,अशी सूचना कार्यालयीन कर्मचार्‍यांना केली आहे. त्यामुळे महापौर महाडेश्वर यांना भेटावयास जाणाऱ्याना आता आपला मोबाईल सुरक्षारक्षकडे जमा करावा लागणार आहे .   

मोबाईल आता केवळ संभाषणाचे साधन उरलेला नाही . मोबाईलवर आता शक्तिमान कॅमेरे बसवलेले असतात . तसेच संभाषण ध्वनिमुद्रित करण्याची सोया देखील हल्ली मोबाईलमध्ये असते .  महापालिकेच्या परिसरात काही अधिकाऱ्यांना अशा प्रकारे  मोबाईलवर  व्हिडीओ शुटींगकरून  अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले असल्याची चर्चा  आहे . 

यापार्श्वभूमीवर महापौरांनी, बुधवारी आपल्या सर्व कर्मचार्‍यांना तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापौरांच्या दालनाबाहेर आता मोबाईल फोन ठेवण्यासाठी ट्रे ठेवला जाणार आहे. या ट्रेमध्ये मोबाईल ठेवूनच महापौरांच्या भेटीसाठी लोकांना जावे लागणार आहे.

 महापालिकेतील विरोधीपक्ष नेता   रवी राजा याविषयावर भाष्य करताना म्हणाले, "  महापौर यांनी मोबाईलवर बंदी घालण्यापेक्षा स्वतः च्या बोलण्यावर संयम ठेवावा.महापौर जेथेही जातात त्यांच्या वक्तव्यामुळे अडचणीत येतात. लोकांच्या समस्या सोडविणे लोकांना सामोरे जाणे हे महापौरांचे कामच आहे. लोकांवर मोबाईल ची बंदी टाकणे चुकीचे आहे. "  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com