भाजप नगरसेवकांचे होर्डींग हटवणाऱ्या धारणकरांचे महापौर भानसींकडून निलंबन

अनधिकृत होर्डिंग विरोधात उच्च न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार अधिकाऱ्यांनी कारवाई केली. पोलिसांनी पुराव्याचा विचार करूनच गुन्हा दाखल केला. मात्र सभागृहात थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली. संबंधित अधिकारी न्यायालयात गेल्यास महासभेवर कारवाई होण्याची शक्‍यता आहे.
भाजप नगरसेवकांचे होर्डींग हटवणाऱ्या धारणकरांचे महापौर भानसींकडून निलंबन

नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डींग्जविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, त्यानुसार कारवाई केली तर नगरसेवक नाराज होतात. अनधिकृत होर्डींग्ज विरोधात कारवाई केली नाही तर नागरीकांच्या तक्रारी येतात. अशा कात्रीत प्रशासन नेहेमीच अडकते. त्याचा अनुभव आज महापालिकेच्या महासभेतही आला. भाजप नगरसेवकांचे होर्डीग्ज काढल्याने संतप्त नगरसेवकांनी अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली. त्याला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य सर्वच नगरसेवकांनी पाठींबा दिल्याने रवींद्र धारणकर या अधिकाऱ्याला निलंबीत केले. एव्हढेच नाही तर महापौर रंजना भानसी यांनी त्यांना महासभेतून बाहेर जाण्यास सांगीतले. 

रमजान ईदला प्रभाग 23 चे नगरसेवक सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, रुपाली निकुळे, शाहीन मिर्झा यांनी सारडा सर्कल चौकात अनधिकृत होर्डिंग लावले होते. त्यामुळे विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांनी ते काढून टाकले. चौघा नगरसेवकांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याचे पडसाद आज महासभेत उमटले. चौघा नगरसेवकांनी शहानिशा न करता कारवाई केल्याचा दावा केला, गुन्हा दाखल करताना परवानगी का घेतली नाही? असा सवाल करत निलंबन होत नाही तोपर्यंत महासभेत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. भाजप नगरसेवकांच्या मदतीला विरोधी पक्ष धावून आला, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी नगरसेवकांच्या मानसन्मानाचा विषय असल्याने पुर्व विभागाचे विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली. त्यामुळे अखेर महापौरांनी निलंबन केले. 

आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मला विचारले नसल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्तामार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले. मात्र आयुक्ताच्या अजब व्यक्तव्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात आयुक्तांवर संताप केला. धारणकर यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी केली. अखेरीस महापौर भानसी यांनी धारणकर यांना महासभेतच निलंबनाची घोषणा करत सभागृहातून बाहेर पडण्यास सांगितले, धारणकर यांना अपमानास्पदरीतीने बाहेर पडावे लागले. 

.... तर महासभेवर कारवाई?
अनधिकृत होर्डिंग विरोधात उच्च न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, त्यानुसार अधिकाऱ्यांनी कारवाई केली. पोलिसांनी पुराव्याचा विचार करूनच गुन्हा दाखल केला. मात्र सभागृहात थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली. संबंधित अधिकारी न्यायालयात गेल्यास महासभेवर कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com