मुंबईत महापौरांसह सहा नगरसेवक पराभूत

शिवसेनेचे रमेश कोरगावकर व दिलीप लांडे, भाजपचे पराग शहा आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख हे चार नगरसेवक आता विधानसभेत दाखल होणार आहेत.
mahadeshwar_vs_trupti
mahadeshwar_vs_trupti

मुंबई : नगरसेवकांनी आमदार बनण्याची परंपरा या निवडणुकीत कायम राहिली. या वेळी चार नगरसेवकांना आमदारकीची लॉटरी लागली आहे. शिवसेनेचे रमेश कोरगावकर व दिलीप लांडे, भाजपचे पराग शहा आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख हे चार नगरसेवक आता विधानसभेत दाखल होणार आहेत.

मुंबईतील 36 विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागला. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या 10 नगरसेवकांनी आणि 10 माजी नगरसेवकांनी अधिकृतपणे, तर काही जणांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली. शिवसेनेचे रमेश कोरगावकर (भांडुप पश्‍चिम), दिलीप लांडे (चांदिवली), भाजपचे पराग शहा (घाटकोपर पूर्व) आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख (भिवंडी) या चार नगरसेवकांनी बाजी मारली. लांडे यांनी कॉंग्रेसचे आमदार नसीम खान यांचा अवघ्या 409 मतांनी पराभव केला, तर भाजपचे मंत्री प्रकाश मेहता यांचा डावलून उमेदवारी देण्याचा निर्णय पराग शहा यांनी सार्थ ठरवला.

शिवसेनेचे नगरसेवक तथा महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचा पक्षातील बंडखोरीमुळे कॉंग्रेसचे झिशान सिद्दिकी यांच्याकडून पराभव झाला. शिवसेनेच्या बंडखोर नगरसेविका राजुल पटेल यांच्यावर भाजप पुरस्कृत डॉ. भारती लव्हेकर यांनी मात केली. कॉंग्रेसचे अमीन कुट्टी यांचा शिवसेनेचे रमेश लटके यांनी पराभव केला. शिवसेनेच्या माजी नगरसेविका यामिनी जाधव यांनी अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी आणि एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांना हरवले. 
मनसेचे संजय तुर्डे यांना शिवसेनेचे संजय पोतनीस यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. कॉंग्रेसचे आसिफ झकेरिया यांना भाजपचे आशीष शेलार यांनी पराजित केले.

हरलेले माजी नगरसेवक
धनंजय पिसाळ (विक्रोळी), विठ्ठल लोकरे (मानखुर्द), अजंता यादव (कांदिवली पूर्व), सुरेश कोपरकर (भांडुप पश्‍चिम), मुरजी पटेल (भाजप बंडखोर, अंधेरी/पूर्व), संजय भालेराव (शिवसेना बंडखोर, घाटकोपर पश्‍चिम), चंगेज मुलतानी (एमआयएम, अंधेरी पूर्व), मनोज संसारे (एमआयएम, धारावी), संदीप देशपांडे (मनसे, माहीम).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com