mayawati birthday 15 jan | Sarkarnama

आजचा वाढदिवस : मायावती - अध्यक्षा, बहुजन समाज पक्ष 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 जानेवारी 2019

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या मायावती यांनी उत्तर प्रदेश सारख्या राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. या पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या तालमीत त्यांची जडणघडण झाली.  दलित आणि वंचित समाजाला राजकारणाच्या माध्यमातून मुख्यप्रवाहात आणण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राजकारण केले. केवळ उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशात बसपला कानाकोपऱ्यात पोचविण्याचे श्रेय अर्थात मायावतींना द्यावे लागेल. 2007 मध्ये त्या दोन तृतीयांश बहुमत मिळवून सत्तेवर आल्या होत्या. राष्ट्रीयस्तरावर मायावतींचा नेहमीच बोलबोला राहिला आहे.

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या मायावती यांनी उत्तर प्रदेश सारख्या राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले. या पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या तालमीत त्यांची जडणघडण झाली.  दलित आणि वंचित समाजाला राजकारणाच्या माध्यमातून मुख्यप्रवाहात आणण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राजकारण केले. केवळ उत्तर प्रदेशच नव्हे तर संपूर्ण देशात बसपला कानाकोपऱ्यात पोचविण्याचे श्रेय अर्थात मायावतींना द्यावे लागेल. 2007 मध्ये त्या दोन तृतीयांश बहुमत मिळवून सत्तेवर आल्या होत्या. राष्ट्रीयस्तरावर मायावतींचा नेहमीच बोलबोला राहिला आहे. मायावती बहेनजी आणि कुमारी मायावती या नावानेही संबोधले जाते. सार्वजनिक जीवनातील कार्याची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार आणि मान सन्मानही मिळाले. "आयर्न लेडी' व "ऑयकॉनिक वूमन' म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख