"आरएसएस'ने करकरे यांची हत्या केली : जिग्नेश मेवाणी

 "आरएसएस'ने करकरे यांची हत्या केली : जिग्नेश मेवाणी

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहा विकला असेल किंवा नसेल परंतु, भगवान रामाला, मात्र ते विकायला निघाले आहेत, असा हल्लाबोल दलित नेते व गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पिंपरी चिंचवडमध्ये केला. शहीद हेमंत करकरे यांची हत्या "आरएसएस' ने केल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी यावेळी केला. मोदी,अमित शहा आणि मोहन भागवत हे देशासमोरील ज्वलंत प्रश्नावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मंदिर-मस्जिद आणि हिंदी भाषेवरून फूट पाडत असल्याची टीका मेवाणी यांनी यावेळी केली. 

मोदी, शहा आणि मी गुजराती आहे. परंतु, त्यांचे नाते नथुराम गोडसे, गोळवलकर आणि सावरकर यांच्याशी, तर माझे नाते राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी आहे असे ते म्हणाले. राज्यघटनेला नष्ट करून मनुस्मृती लागू करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत, असा आरोप त्यांनी केला. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा संविधान दिन सोहळा समिती आणि राष्ट्रीय दलित एकता मंचातर्फे, पिंपरी येथे भारतीय संविधान जनजागरण अभियानात मेवानी बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे अध्यक्षस्थानी होते. माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे-पाटील, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक मारूती भापकर, संयोजक नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ आदी यावेळी उपस्थित होते. 

देशात हिंदी भाषा लागू करण्याच्या अमित शहा यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना मेवाणी म्हणाले, " हे दोघे सत्तेवर आल्यावर काय होईल.याची आम्हाला यापूर्वीच कल्पना होती. हिंदी भाषा जबरदस्तीने लादली जात आहे. तामिळनाडू येथे हे लोक जाऊन म्हणतील, हिंदी भाषा बोला. मात्र, कोणती भाषा बोलायची याचा अधिकार आम्हाला राज्य घटनेने दिला आहे. या सत्ताधारी फॅसिस्ट लोकांना सत्तेची मस्ती चढली आहे. परंतु, मोदी-शहा, भागवत हे युगानुयुगे राहणार नाहीत. आपल्या डोळ्यासमोरच भाजप-संघ यांची समाप्ती होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com