मावळात घाटावर उद्धव ठाकरेंची, तर घाटाखाली राज ठाकरेंची तोफ उद्या धडाडणार 

एकाच दिवशी, एकाच मतदारसंघात आणि एकाच वेळेस दोन ठाकरेंच्या सभा होण्याचा दुर्मिळ योग पहिल्यांदाच मावळ लोकसभा मतदारसंघाच्या वाट्याला यावेळी आला आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे एकमेकांविरोधात दोन्ही ठाकरेंच्या तोफा धडाडणार आहेत. परिणामी या दोन्ही सभांविषयी मावळवासियांत प्रचंड उत्सुकता आहे.
मावळात घाटावर उद्धव ठाकरेंची, तर घाटाखाली राज ठाकरेंची तोफ उद्या धडाडणार 

पिंपरीः एकाच दिवशी, एकाच मतदारसंघात आणि एकाच वेळेस दोन ठाकरेंच्या सभा होण्याचा दुर्मिळ योग पहिल्यांदाच मावळ लोकसभा मतदारसंघाच्या वाट्याला यावेळी आला आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे एकमेकांविरोधात दोन्ही ठाकरेंच्या तोफा धडाडणार आहेत. परिणामी या दोन्ही सभांविषयी मावळवासियांत प्रचंड उत्सुकता आहे.

गत लोकसभेलाही राज यांची मावळसाठी पिंपरी-चिंचवडमध्ये घाटावर जाहीर सभा झाली होती. यावेळी ती घाटाखाली पनवेलला होत आहे. मोदी व शहामुक्त भारत मोहिमेच्या दुसऱ्या टप्यातील त्यांची ही तिसरी सभा आहे. त्यामुळे मावळातील शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या समर्थकांच्या उरात आताच धडकी भरली आहे. उद्या राज कुठला नवा व्हिडिओ दाखवतात त्याची चर्चा आताच सुरु झाली आहे. मात्र, या सभेचा आमच्या उमेदवारावर कसलाही परिणाम होणार नाही, असे शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहर संपर्कप्रमुख बाळा कदम यांनी आज सांगितले.

उद्धव व राज यांच्या सभा सायंकाळी होत आहेत. उद्धव यांची गतवेळी मावळकरिता घाटावर पिंपरी-चिंचवडमध्येच सभा झाली होती. यावेळीही ती घाटावर शहरातच उद्या होणार आहे. शिवसेनेचे पुण्याचे विभागीय नेते खासदार संजय राऊत आणि आरपीआय (आठवले गट) रामदास आठवले, भाजपचे खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप आदी उपस्थित राहणार आहेत. 

गतवेळप्रमाणे यावेळचीही उद्धव यांची सभा भाजपचे आमदार जगताप यांच्या चिंचवड मतदारसंघात होत आहे. त्यापूर्वी उद्धव यांची उद्याच शिरूरसाठी चाकण येथे जाहीर सभा होत आहे. गतवेळीही त्यांची शिरुरसाठीची सभा चाकणलाच झाली होती. त्यावेळी व आताही शिरुरचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हेच आहेत. मावळातही विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनाच शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिलेली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com