maval gets Rs 1400 crore funds : Bhegade | Sarkarnama

मावळात 1400 कोटींचा निधी : भेगडे

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

वडगाव मावळ, ता. 10 : ""मी राज्यमंत्री झाल्यापासून तीन महिन्यांत मावळ तालुक्‍यात 1400 कोटींचा निधी विविध विकासकामांसाठी आणला आहे. पुन्हा संधी मिळाल्यास मावळ तालुक्‍याचे चित्र नक्कीच बदलेल,'' असा विश्‍वास राज्यमंत्री व मावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे यांनी व्यक्त केला.

गावभेटीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. गुरुवारी (ता. 10) काही गावांत भेगडे यांनी दुचाकी आणि चारचाकी वाहन चालवत प्रचार केला.

वडिवळे, बुधवडी, सांगिसे, वेल्हवळी, नेसावे, खांडशी, उंबरवाडी, भाजगाव, कोळवाडी, वळवंती, उकसाण, पाले नामा, गोवित्री, सावळेवाडी, करंजगाव, ब्राह्मणवाडी, मोरमारवाडी, कांब्रे, कोंडिवडे, नाणे, नवीन उकसाण, नाणोली, साई, वाउंड, कचरेवाडी, घोणशेत, ठिकाणी कामे पूर्ण होत असल्याने आणि काही कामांचे उद्‌घाटन झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. प्रचारादरम्यान गावागावांत युवकांनी भेगडे यांना खांद्यावर बसवून गावातून जल्लोषात मिरवणूक काढली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख