बारणेंची भिस्त लक्ष्मणभाऊंवर तर; पार्थ यांची भिस्त जयंतरावांवर

बारणेंची भिस्त लक्ष्मणभाऊंवर तर; पार्थ यांची भिस्त जयंतरावांवर

पिंपरी : मावळातील शिवसेनेची हॅटट्रिक आणि त्यांचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा  विजय हा  घाटावरील मतदार ठरविणार आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांचा विजय हा घाटाखालील मतदारांवर अवलंबून
आहे. थोडक्यात बारणेंच्या विजयात घाटावरील  पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर काही अंशी अवलंबून आहे.तर, पार्थ यांचे भवितव्य मोठ्या प्रमाणावर शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या हाती आहे.

मावळात 21 उमेदवार रिंगणात होते. मात्र, खरी लढत ही वरील दोघा उमेदवारांतच आहे. हा मतदारसंघ निर्माण झाल्यानंतर तेथे गजानन बाबर हे शिवसेेनेचेपहिले खासदार 2009 ला झाले. तर, गतवेळी 2014 ला बारणे निवडून आले. यावेळी ते दुसऱ्यांदा रिंगणात आ्हेत. तर, पार्थ यांची ही पहिलीच निवडणूक आहे.

या दोघांची आजची मतदानाच्या दिवशी  दिसलेली देहबोली आणि हालचाल ही त्यांचे भवितव्य सांगूुन गेली. बारणे हे घाटावर,तर पार्थ हे घाटाखाली फिरताना आढळले. बारणेंच्या विजयात भाजपचा मोठा वाटा राहणार आहे. तर पार्थ निवडून आले तर त्याचे श्रेय राष्ट्रवादीची कधी नव्हे ती झालेली एकजूट आणि घाटाखालील शेकापच्या ताकदीला मिळणार आहे.

मावळमध्ये सोमवारी मतदान झाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक  झाले आहे. त्याचा फायदा हा राष्ट्रवादीला होणार आहे. तसेच घाटावरील मावळच्या तीन विधानसभा मतदारसंघापेक्षा घाटाखालील तीन मतदारसंघात मतदान जास्त झाले आहे. घाटाखाली शेकापची ताकद मोठी आहे. तेथे जयंत पाटील यांचा मोठा प्रभाव आहे.

त्यात गतवेळी शिवसेना पिछाडीवर असलेल्या उरणय मतदारसंघात यावेळी सर्वाधिक मतदान झाले आहे. तर भाजप आमदार असलेल्या तिन्ही ठिकाणी ते कमी झाले आहे. उरणनंतर सर्वाधिक मतदान हे राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या कर्जत-खालापूर मतदारसंघात झाले असून ही बाब पार्थ यांच्या दृष्टीने जमेची ठरणार आहे. दोन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे.मात्र,कोण बाजी मारणार हे 23 मे रोजीच स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com