मावळमध्ये भाजपचे दबावतंत्र !

 मावळमध्ये भाजपचे दबावतंत्र !

पिंपरी : युतीनंतरही शिवसेनेच्या मावळवर भाजपकडून दावा करणे सुरुच असून त्यासाठी मिसकॉल मोहीम मतदारसंघात आता त्यांनी सुरू केली आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मावळचे आपले खासदार श्रीरंग बारणेंनाच पाठिंबा असल्याने भाजपच्या या दबावतंत्राचा उपयोग होणार नाही, अशीच तूर्त चिन्हे आहेत. 

युती झाल्याने शहराचे दुसरे खासदार शिवसेनेचेच शिरुरचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दुसरीकडे आपले कट्टर विरोधक भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडे टाळी मागितली आहे. एवढेच नाही तर आतापर्यंत त्यांच्यावर टीका करणाऱ्या आढळरावांनी इंद्रायणीथडी जत्रेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल महेशदादांचे कौतुकही केले आहे. 

दुसरीकडे, मात्र मतदारसंघावरच भाजपने दावा केल्याने बारणेंनी अजून आपले कट्टर विरोधक आणि चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याकडे टाळीसाठी हात पुढे केलेला नाही. 

युतीच्या जागावाटपात मावळ शिवसेनेकडे आहे. गेले दोन टर्म तेथून त्यांचा खासदार निवडून येत आहे. हॅंटट्रिकच्या तयारीत ते यावेळी आहेत.तरीही यावेळी भाजपने मावळवर दावा केला आहे.जगताप यांच्यासाठी तो मागण्यात आला आहे. प्रत्यक्षात त्यांचा विरोध हा बारणेंना आहे. बारणेंऐवजी दुसरा उमेदवार त्यांना चालणार आहे.म्हणून त्यांनी प्रेशर टॅंक्‍टिस सुरु केल्याचे समजते. 

ते अजून सुरूच आहे आता तारखेपासून मावळ एमतदारसंघात त्यांनी मिसकॉल मोहीम सुरू केली आहे, मावळच्या सर्वांगीण विकासासाठी, मतदारसंघ हवा फक्त भाजपसाठी ही आकर्षक टॅंगलाईन त्याकरिता दिली आहे. तारखेपर्यंत येथे अंदाजे पन्नास हजार मिसकॉल येतील.हा नाव आणि नबरचा डाटा पक्षाध्यक्ष अमित शहा व इतर नेत्यांना दिला जाणार असल्याचे ही मिसकॉल मोहीम सुरू करणारे पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस आणि प्रवक्ते अमोल थोरात यांनी आज सरकारनामाला सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com