matin mim | Sarkarnama

एमआयएममधून हकालपट्टी होताच मतीनला महापालिकेच्या सभागृहातून बाहेर काढले

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

औरंगाबाद : एमआयएम पक्षातून हकालपट्टी होताच वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन यांना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतून मंगळवारी (ता. 11) पुन्हा एकदा बाहेर काढण्यात आले. भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतल्यानंतर महापौरांनी ही कारवाई केली. नगरसेवक सय्यद मतीन यांच्या वादग्रस्त भुमिकांमुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वारंवार वाद निर्माण झाले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजप नगरसेवकांनी मतीन यांनी बेदम मारहाण करण्यात आली होती. यावेळी महापौरांनी त्यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

दरम्यान या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व मतीन यांना हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. कारागृहातून बाहेर आल्यानंतर मतीन यांनी गेल्या सभेला हजर राहण्याचा प्रयत्न केला मात्र भाजप नगरसेवकांनी त्यावेळी विरोध केला. मतीन यांची पक्षविरोधी कारवाया केल्याबदल एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी 11.30 ला सभेला सुरवात झाली. आज 12 वाजता मतीन सभागृहात आले असता भाजपचे प्रमोद राठोड, राज वानखेडे, उपमहापौर विजय औताडे यांनी आक्षेप घेतला. मतीन यांना सभागृहातून बाहेर काढा अन्यथा आम्ही बंदोबस्त करू असा इशारा दिला. त्यानंतर महापौरांनी त्यांना बाहेर काढले. 

एन्ट्री मार के गया 
तीन सभेला मतीन हजर राहु शकले नाही. त्यांना गेटवर रोखण्यात आले होते. मंगळवारी ते थेट सभेत हजर झाले. महापौरांच्या आदेशनंतर बाहेर पडताना त्यांनी "एन्ट्री मार के गया' असा असे उद्‌गार काढले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख