matath agitaition in alandi | Sarkarnama

राणे पितापुत्रांचा आळंदीत निषेध 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

आळंदी ः माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे पूत्र नीतेश राणे हे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करीत असल्याचा आव आणत आहेत. या पितापूत्रांची धडपड मराठा आरक्षणासाठी नसून वैयक्तिक आहे. मंत्रिपदाच्या लालसेसाठी असल्याचा आरोप करीत आळंदी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला असून कडकडीत बंदही पाळण्यात आला. 

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील मराठा आंदोलनाबाबत वेगवेगळी वक्तव्य व्यक्त करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा निषेधही समाजातर्फे करण्यात आला. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चासाठी शेकडो मराठा आंदोलकांनी हजेरी लावली. शहरातील दुकाने सकाळपासूनच बंद ठेवून फडणवीस सरकारच्या विरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला. 

यावेळी मोर्चाची सुरूवात सकाळी साडे दहाच्या दरम्यान आळंदीतील चाकणचौकातून करण्यात आली. त्यानंतर प्रदक्षिणा रस्त्यावरून मोर्चा चावडी चौक, महाद्वार चौक आणि पालिका चौकात आणण्यात आला. यावेळी मरकळ चौक आणि पालिका चौकात मोर्चेकरांनी ठिय्या मारून रास्ता रोको केला. पालिका चौकातून नदीपलिकडे देहूफाटा येथे मोर्चे करांनी सरकारच्या विरोधात घोषणात देत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली. 

दरम्यान मोर्च्यासाठी शहरातील माजी नगरसेवक डी.डी.भोसले,नगरसेवक प्रकाश कु-हाडे,उत्तम गोगावले,संदिप नाईकरे,आनंद मुंगसे,योगेश दिघे,लखन घाटगे,संग्राम भंडारे,भागवत शेजवळ यांच्यासह सविता गावडे,मंगल हुंडारे,रूपाली पानसरे,पुष्पा कु-हाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. 
पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. 

दरम्यान उत्तम गोगावले यांनी सांगितले की,राणे पितापुत्र स्वताच्या लाभासाठी सरकारबरोबर चर्चा करत आहे. मराठा आरक्षण आणि आंदोलनाचा राणे पितापुत्रांशी संबंध नाही. यामुळे सकल मराटा आंदोलक जी भूमिका घेतील तीच सर्वांनी मान्य करायची आहे. संदीप नाईकरे यांनी सांगितले. 

की,निवडणूकीत दिलेली आश्वासने सरकारने पाळली नाहीत. मराठा समाजाची दिशाभूल सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. राज्यातील आंदोलने आणि मोर्च्यांना सरकार सामोरे जात नाही हे सरकारचे अपयश आहे. यावेळी डी.डी.भोसले, लक्ष्मण पाटील यांनीही सरकारचा निषेध केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख