`आठवलेंनी माफी मागितल्याने मातंग समाजाने आंदोलन थांबवावे`

`आठवलेंनी माफी मागितल्याने मातंग समाजाने आंदोलन थांबवावे`

मुंबई :  चूक नसतानाही मातंग समाजाप्रती जाहीर दिलगिरी व्यक्त केल्यानंतर केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंविरुद्ध  निषेधाची गरळ ओकण्याची गरज काय ? मातंग बांधवांकडून आठवलेंविरुद्ध केले जात असलेले आंदोलन आणि सोशल मिडियातील होत असलेली गलिच्छ टीका आंदोलकांनी थांबवावी, असे आवाहन मातंग समाज समन्वय समितीतर्फे करण्यात आले.

पिंपरी चिंचवड येथे केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी माझी मैना गावावर राहिली या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या छक्कड वरून जे वक्तव्य केले त्याबद्दल मातंग समाज गैरसमजातून  आठवलेंवर टीका करीत निषेधाचे आंदोलन मातंग समाजातील काही लोक करित आहेत. त्यांना रोखण्याचे आवाहन करणारी पत्रकार परिषद मातंग समाज समनव्य समितीने  मुंबईत घेतली.

मातंग समाजातील अति उत्साही तरूणांनी सावध व्हावे;  बौद्ध आणि मातंग समाजात तेढ निर्माण करण्याच्या राजकारणाचे कुटील डाव ओळखण्याचे आवाहन मातंग समाज समन्वय समितीच्या वतीने आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते शंकरराव साठे, अमर कसबे, नंदू साठे, दुर्गाताई चव्हाण, विशाल तुपसुंदर, मंगलाताई आल्हाट आदी नेत्यांनी केले.

आठवले हे कायम मातंग समाजाचे पाठीराखे म्हणून सदैव समाजाच्या सुखदुःखात सहभागी होतात. मातंग समाजावर जेंव्हा जेंव्हा अन्याय अत्याचार होतो तेंव्हा तेंव्हा पोलिसांआधी आठवले मदतीला धावून आलेले आहेत. त्यामुळे मातंग समाजात रामदास आठवले यांच्याप्रति आपुलकी कायम राहिली आहे. बौद्ध व मातंग दोन्ही समाजाची आंबेडकरी चळवळीत एकजूट निर्माण झाली आहे. त्यामुळे काही हितशत्रू  रामदास आठवलेंविरुद्ध  मातंग समाजात असंतोष भडकविण्याचे आणि त्यातून बौद्ध व मातंग वाद लावण्याचे प्रयत्न करीत आहेत. आमची मातंग समाजातील आंदोलकांना विनंती आहे की त्यांनी आठवले यांच्या विरोधातील हिन विरोधाचे आंदोलन मागे घ्यावे. रामदास आठवलेंविरुद्ध गैर समाजातून होणारे आंदोलन थांबवावे, असे आवाहन करण्यात आले. 

ज्या प्रकरणामुळे हे निषेधाचे वातावरण उभे केले जात आहे त्या प्रकरणाबद्दल ना रामदास आठवले यांनी त्वरित तेथेच मातंग समाजची जाहीर माफी मागितली आहे.  आठवले यांनी वाक्य वापरले ते आजच्या तरुण पिढीच्या उथळपणाबद्दल होते.कोणत्याही समाजविरुद्ध नव्हते.  त्यामुळे हे प्रकरण मिटविले पाहिजे. यामध्ये राजकारण कोणी करू नये, असे आवाहन आज मातंग समाज समन्वय समिती चे अमर कसबे, शंकर साठे, नंदू साठे, विशाल तुपसुंदर आदी नेत्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com