मातंग समाजाला 12 जागा द्या; पवारांकडे मागणी!

बगाडे यापूर्वी वंचित बहुजन आघाडीत कार्यरत होते. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पुण्यात मातंग समाज सत्तासंपादन मेळावा घेतला होता.
मातंग समाजाला 12 जागा द्या; पवारांकडे मागणी!

पुणे:  दलित युवक आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत बगाडे आणि सहकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. 

बारामती येथे मातंग समाजाच्या नेत्यांना सोबत घेऊन बगाडे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी जनहित लोकशाही पार्टीचे अशोकराव आल्हाट, जनता क्रांती दलाचे सत्यवान कमाने, मातंग क्रांती दलाचे श्रीकांत शिंदे, फकिरा बिग्रेडचे अध्यक्ष डॉ संजय शिंदे, महाराजा प्रसेनजीत सेवा संघाचे अध्यक्ष ऍड शिवराज कोळीकर आदि उपस्थित होते.

यावेळी पवार यांच्याकडे या शिष्टमंडळाने मातंग समाजाच्या प्रश्नाचे निवेदन दिले. विधानसभा निवडणुकीत बारा जागांची मागणी केली.
"भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या पाठिंब्याचा आघाडीला फायदा होईल "असे बगाडे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com