सांगली जिल्हा परिषदेतल्या ठाणेदारांना बसणार दणका

जिल्हा परिषदेत प्रशासकीय मार्च सुरु होण्याआधी भूकंप होणार, असे संकेत मिळालेत. त्याची सुरवात मिरज पंचायत समितीत मंगळवारी झालेल्या सर्जिकल स्ट्राईकने झाली. या प्रकरणात काही कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी लागेल तर काहींना बदलीच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे
Mass Transfers on Card in Sangli Zilla Parishad
Mass Transfers on Card in Sangli Zilla Parishad

सांगली :  जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे एकाच टेबलावर बसलेल्या ठाणेदारांना दणका मिळण्याची तयारी सुरु झाली आहे. येत्या 15 दिवसांत या ठाणेदारांच्या बदलीचा कार्यक्रम लागणार आहे. मार्च एंड आहे, कामांवर परिणाम होईल, अशी कोणतीही सबब चालू न देता ही प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी घेतला आहे.

जिल्हा परिषदेत प्रशासकीय मार्च सुरु होण्याआधी भूकंप होणार, असे संकेत मिळालेत. त्याची सुरवात मिरज पंचायत समितीत मंगळवारी झालेल्या सर्जिकल स्ट्राईकने झाली. या प्रकरणात काही कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी लागेल तर काहींना बदलीच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. दोन दिवसांत अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचा निर्णय होईल. सोबतच, सर्व विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यकालाची माहिती संकलित करण्याचे काम सुरु झाले आहे. 

कुणी चेहरा लपवू नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यमिक शिक्षण विभागातील पोपट पडळकर या निलंबित कर्मचाऱ्याने पंधरा वर्षे एकाच जागेवर काढली. त्याच्या विषयीच्या रकान्यात 'निरंक' शेरा मारून अहवाल दिला जात होता. वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक करून अनेकांनी खुर्च्यांवर मक्तेदारी निर्माण केली.

माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागात अशा लोकांची संख्या भरमसाठ आहे. त्यांच्याकडून होत असलेल्या फायली अडवणुकीचा आता पंचनामा सुरु झाला आहे. उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी त्याची सुरवात केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊत यांच्याशी त्यांनी चर्चा केली. या प्रकरणात कुणाची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट धोरण ठरले आहे. 
पेन्शनच्या फाईल का अडवल्या जात आहेत, माध्यमिक शिक्षण विभागातील पदोन्नतीच्या फायलींना पाय का फुटत नाही, याची चौकशीही अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी सुरु केली आहे. या एकूण प्रकरणात काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जोरदार लॉबिंग समोर येत आहे. ते लॉबिंग मोडून काढण्यासाठी बदलीचे हत्यार उपसण्यात येणार आहे. त्यात ठाणेदारांना दणका बसणार हे अटळ आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com