masketier app | Sarkarnama

"मस्केटियर' सेफ्टी ऍप्लिकेशनचे अनावरण 

सरकारनामा न्यूजब्युरो 
शुक्रवार, 3 मार्च 2017

विकासात्मक वाढ होण्यासाठी तंत्रशिक्षणाच्या विकासावर अधिक भर देण्याची गरज आहे. तसेच, प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षणपद्धती अवलंबली पाहिजे, असे
मत पंतप्रधानांचे माजी तांत्रिक सल्लागार आणि आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांनी व्यक्त केले. 

पुणे : विकासात्मक वाढ होण्यासाठी तंत्रशिक्षणाच्या विकासावर अधिक भर देण्याची गरज आहे. तसेच, प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षणपद्धती अवलंबली पाहिजे, असे
मत पंतप्रधानांचे माजी तांत्रिक सल्लागार आणि आयआयटी कानपूरचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांनी व्यक्त केले. 

"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)', "जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (जेएसपीएम)' आणि "द शेतकरी शिक्षण मंडळ (टीएसएसएम)'च्या नऱ्हे येथील "भिवराबाई सावंत
अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सुरू झालेल्या "टेक्‍नोव्हिजन 2017' या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. धांडे बोलत होते. "नाईस कंपनी'चे प्रमुख
मुकेश जैन, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे संचालक बॉबी निंबाळकर, क्‍लॅरियन टेक्‍नॉलॉजीचे प्रमुख सुरेश मेनन, "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)'चे मुख्य व्यवस्थापक
तेजस गुजराथी, जेएसपीएमचे संचालक अनिल भोसले, भैरवनाथ शुगर वर्क्‍सचे अविनाश वाडेकर, संस्थेचे विश्‍वस्त ऋषिराज सावंत, संकुल संचालक एस. आर. थिटे,
प्राचार्य डॉ. डी. एम. बिलगी, प्रा. डी. आर. पिसाळ या वेळी उपस्थित होते. या स्पर्धेत विविध अभियांत्रिकी पदवी व पदविका महाविद्यालयांतील सुमारे 5 हजार
विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध 40 प्रकारच्या तांत्रिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

याप्रसंगी निंबाळकर आणि डॉ. धांडे यांच्या हस्ते डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या "मस्केटियर' या सेफ्टी ऍप्लिकेशनचे अनावरण झाले निंबाळकर यांनी सध्याच्या
काळात डिजिटल टेक्‍नॉलॉजीची मोठी गरज असल्याचे मत व्यक्त केले, तर मेनन यांनी टेक्‍नॉलॉजी वेगाने बदलत असून, विद्यार्थ्यांनी स्वतःला नेहमीच जागरूक ठेवले
पाहिजे, असे सांगितले. तसेच, जैन यांनी विद्यार्थ्यांनी निराश न होता प्रत्येक आव्हानाला सकारात्मकरीत्या सामोरे जा, असा सल्ला दिला. उपप्राचार्य डॉ. जी. ए. हिंगे,
प्रा. जी. एस. धुमाळ, प्रा. पी. आर. काळे, डॉ. एम. ए. चौधरी, डॉ. व्ही. एम. शिंदे आदींनी संयोजन केले. विशाल तिवारी, मृगांशी ड्राबू, शंतनू आदिक व राधिका सराफ
यांनी सूत्रसंचालन केले. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख