आंदोलनाच्या रणभूमीतून आमदार आशिष देशमुखांचा काढता पाय

शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाची राज्य सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे 12 वीच्या परीक्षेचे कारण पुढे करून आमदार देशमुख यांनी आंदोलनाच्या रणभूमीतून काढता पाय घेतला.
आंदोलनाच्या रणभूमीतून आमदार आशिष देशमुखांचा काढता पाय

नागपूर : शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाची राज्य सरकारने कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे 12 वीच्या परीक्षेचे कारण पुढे करून आमदार देशमुख यांनी आंदोलनाच्या रणभूमीतून काढता पाय घेतला. 

दहा दिवसांपूर्वी विदर्भात झालेल्या गारपिटीमुळे नागपूर जिल्ह्यातील काटोल व नरखेड तालुक्‍यातील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नागपूर जिल्ह्यातील जवळपास 16 हजार हेक्‍टर शेतीतील शेतमालांचे तसेच संत्री व मोसंबी फळबागांचेही नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी आमदार आशिष देशमुख यांनी आठ दिवसांपूर्वी काटोल येथील उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनीही भेट दिली होती. या आंदोलनाच्या माध्यमातून आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

या आंदोलनाला आठ दिवस झाल्यानंतरही राज्य सरकारने त्याची कोणतीही दखल घेतली नाही. राज्य सरकारतर्फे मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारीही चर्चेसाठीही ठिय्या आंदोलनात फिरकला नाही. राज्य सरकार कोणतीही दखल घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने आंदोलन मागे घेण्याची पाळी आमदार देशमुखांवर आली. बुधवारपासून 12 वीची परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेचे कारण पुढे करून अखेर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात येत असल्याचे आमदार देशमुख यांनी जाहीर करून या आंदोलनातून सुटका करून घेतल्याचे बोलले जात आहे. या ठिय्या आंदोलनाचे फलित काय? हे अद्यापही लोकांना व शेतकऱ्यांना समजलेले नसल्याचेही बोलले जात आहे.

23 ला शेतकरी मेळावा
ठिय्या आंदोलन रद्द करून आता येत्या 23 फेब्रुवारीला काटोल येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्याची घोषणा आमदार देशमुख यांनी केली आहे. या मेळाव्यात शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. या मेळाव्यात राज्य सरकारला पुन्हा लक्ष्य केले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com