martha krnati morcha and aurangabad | Sarkarnama

चाबकाचे फटकारे ओढून घेत मराठा आंदोलकांनी स्वतःला करून घेतली शिक्षा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने आंदोलकांनी अंगावर चाबकाचे फटकारे ओढून निषेध नोंदविला. क्रांती चौकातील ठिय्या आंदोलनात रविवारी (ता. 29) आंदोलक आक्रमक झाले होते. समन्वयक म्हणून कमी पडल्याची भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली. मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून क्रांती चौकात ठिय्या आंदोलन आणि उपोषण सुरू आहे. मागणी लावून धरण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने हाती घेतली जात आहेत. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी बाराच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पोतराजाच्या वेशात येऊन आंदोलन केले. 

यावेळी अंगावर चाबकाचे फटकारे ओढत महिला, तरुणांनी आंदोलनात सहभाग घेतला. हलगी वाजवत आंदोलकांनीच पोतराजाची भूमिका निभावली. "मराठा आरक्षणासाठी दोन वर्षांत शांततेत मोर्चे काढले. राज्य मागासवर्ग आयोगाला पुरावे गोळा करून दिले. तरीही सरकार दखल घेत नाही. समन्वयक म्हणून आम्ही कमी पडलो की काय? अशी भावना मनात आहे. स्वतःला शिक्षा म्हणून अंगावर चाबकाचे फटके मारून घेण्याचे आंदोलन केल्याचे पोतराज झालेल्या समन्वयकांनी स्पष्ट केले. 

चर्चेसाठी गेलेल्यांवर बहिष्कार 
मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेला कोणी जाणार नाही असे ठरले होते; मात्र तरीही रविवारी (ता. 29) मुंबईत होत असलेल्या चर्चेला औरंगाबादेतून तीन समन्वयक गेले असल्याची चर्चा आहे. चर्चेला गेले असल्याचे सिद्ध झाल्यास मराठा क्रांती मोर्चा त्या समन्वयकांवर बहिष्कार टाकेल असा इशारा देखील तरूण आंदोलकांनी दिला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख