martha aandolan planning in nagar | Sarkarnama

#Maratha9August नगरमध्ये आंदोलनस्थळीच पेटविणार चुली 

मुरलीधर कराळे 
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नगर : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने नऊ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आंदोलनात कुटुंबासह उपस्थित राहत आंदोलनस्थळीच चुली बनवून जेवण करण्याचे नियोजन आंदोलकांनी केले आहे. 

माळीवाडा येथील बसस्थानकाजवळील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी नऊ वाजता सर्वात मोठा रास्ता रोको होणार आहे, असा निर्णय समाजाच्या बैठकित घेण्यात आला. 

जोपर्यंत सरकार आरक्षणाबाबत निर्णय देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे काही आंदोलक जेवणाचे डबे सोबत घेवून रस्त्यावरच जेवण करणार आहेत. सकल मराठा समाजाने सोशल मीडियावर शांततेत मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. कुठेही जाळपोळ होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हाभरातील प्रमुख महामार्ग रोखण्यात येणार आहेत. मोर्चाच्या दिवशी हॉस्पिटल, वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन आंदोलकांनी केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख