martaha kranti morcha vadanavni | Sarkarnama

बीड जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम; वडवणीत मोठा मोर्चा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

बीड : मराठा समाजाला आरक्षण द्यावे व आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत शासनाची मेगा भरती थांबवावी या मागणीसाठी जिल्ह्यात नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची धग कमी व्हायला तयार नाही. गुरुवारी मोर्चा, रास्ता रोको आंदोलने झाली. गेवराईत आंदोलकांची पोलिसांनी धरपकड सुरु केली आहे. 

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बुधवारी परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाला. ठोस निर्णय होईपर्यंत माघार नाही असा पवित्रा घेत आंदोलकांनी तहसिल कार्यालय परिसरात सुरु केलेले ठिय्या आंदोलन नवव्या दिवशी गुरुवारीही सुरुच होते. अन्नदानासाठी समाजातील दाते सरसावले असून आंदोलनस्थळी स्वयंपाकाला आडोसा म्हणून पत्र्याचे शेड मारले असून वॉटरप्रुफ मंडपही उभारला आहे. तर, या ठिय्याला समर्थन आणि त्यानंतर आरक्षण मागणीसाठी दोघांचे बलिदान याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली आहे. बुधवारी गेवराईत अर्धनग्न आंदोलनानंतर आंदोलकांची आणि भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्यात बाचाबाची व नंतर पोलिस व आंदोलकांत राडा झाला. या आंदोलकांची पोलिसांनी मध्यरात्रीपासून धरपकड सुरु केली आहे. दरम्यान, वडवणी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलवर भव्य मोर्चा निघाला. तर, मोठेवाडी (ता. माजलगाव) येथे रास्ता रोको आंदोलन झाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख