भाजपला रोखण्यासाठी जुन्याच कायद्याने बाजार समितीच्या निवडणुका

ज्या शेतकऱ्यांकडे 10 गुंठे शेतजमीन आहे अशांना सेवा सहकारी सोसायटीचे खातेदार बनविण्यात येण्याचे या कायद्यात नमूद होते. त्यामुळे बाजार समितीच्या मतदार संख्येत कमालीची वाढ होणार होती.
new plan to block BJP in market committee elections
new plan to block BJP in market committee elections

अमरावती :  राज्यातील बाजार समितीच्या निवडणुका आता नवीन कायद्यानुसार होणार आहेत. यामध्ये पुन्हा सेवा सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत सदस्यांनाच मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे तत्कालीन फडणवीस सरकारने 2017 मध्ये केलेला कायदा मोडीत निघाला असून थेट शेतकऱ्यांना आता मतदानाचा अधिकार राहलेला नाही.


सहकार क्षेत्रात बाजार समित्यांना मोठे महत्त्व आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांवर राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी व राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेसचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा नवा कायदा केला होता. ज्या शेतकऱ्यांनी सलग तीन वर्ष बाजार समितीत शेतमाल विकला आहे, अशा शेतकऱ्यांना त्यासाठी पात्र ठरविण्यात आले.


 ज्या शेतकऱ्यांकडे 10 गुंठे शेतजमीन आहे अशांना सेवा सहकारी सोसायटीचे खातेदार बनविण्यात येण्याचे या कायद्यात नमूद होते. त्यामुळे बाजार समितीच्या मतदार संख्येत कमालीची वाढ होणार होती. अमरावती जिल्ह्यात बारा बाजार समितींतर्गत 4 लाख 16 हजार शेतकरी या कायद्यान्वये पात्र ठरणार होते.


पुढील वर्षी बाजार समितीच्या निवडणुका आहेत. दरम्यान राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर तत्कालीन फडणवीस सरकारने केलेले कायदे रद्द करून बदल करण्यात येत आहेत. सहकार क्षेत्रातील बदलांवर विशेषतः लक्ष देण्यात आले असून बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भातील जुनाच कायदा पुन्हा कायम करण्यात आला आहे.
 या कायद्यान्वये सेवा सहकारी सोसायटी व ग्रामपंचायत सदस्य मतदान करू शकणार आहेत. अठरा संचालक निवडून द्यायचे असून पंधरा संचालकाना ते मतदान करतात. तर, तीन संचालक अडते, खरेदीदार व हमाल व मापारी यांच्यातून निवडून येतात.
अमरावती बाजार समितीत अमरावती व भातकुली तालूक्‍यात अनुक्रमे 546 व 520 सेवा सहकारी सोसायटीचे, तर 1250 मतदार ग्रामपंचायतीचे आहेत. अडते मतदारसंघात 769, खरेदीदारमध्ये 476 व हमाल मापारी मतदारसंघात अनुक्रमे 318 व 142 मतदार आहेत. पुढील वर्षी बाजार समितीच्या अठरा संचालाकंसाठी निवडणूक होणार आहे.


भाजपला ब्रेक
कायद्यात सुधारणा करण्यात आल्याने भाजपचा सहकार क्षेत्रातील बाजार समित्यामध्ये प्रवेश मिळवण्याचा व राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेसचे या क्षेत्रातील वर्चस्व मोडीत काढण्याच्या इच्छाशक्तीला ब्रेक लागला आहे. सेवा सहकारी व ग्रामपंचायतींवर अजूनही या दोन पक्षांचे वर्चस्व असून त्याचा लाभ त्यांना सहकार क्षेत्रात होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com