वडिलांना तुरुंगात भेटण्यासाठी गेलेल्या मरियम शरीफ यांना अटक

भारताने कलम 370 रद्द केल्यानंतर मरियम यांनी प्रतिक्रिया देताना 'काश्‍मीरचा पाडाव' झाल्याचे सांगत या प्रकरणाला पंतप्रधान इम्रान खान जबाबदार असल्याची टीका केली होती.
Marium-Mushrif.
Marium-Mushrif.

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कन्या मरियम यांना आज आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली. 

भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या नवाज शरीफ यांना तुरुंगात भेटण्यासाठी गेलेल्या मरियम यांना तेथेच अटक करण्यात आली.

मरियम नवाज (वय 45) या पाकिस्तान मुस्लिम लीगच्या (नवाज गट) उपाध्यक्षा असून, आर्थिक गैरव्यवहार आणि बेहिशेबी संपत्ती गोळा करण्याच्या आरोपांवरून त्यांची 31 जुलैला भ्रष्टाचारविरोधी पथकाने चौकशीही केली होती.

लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात मरियम या आज त्यांचे वडील नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी आल्या असता नॅशनल अकौंटेबिलिटी ब्युरोच्या (नॅब) अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. 

मरियम यांना चौधरी साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी अटक केल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. मरियम या "नॅब'च्या प्रश्‍नांना उत्तरे देण्यास टाळाटाळ करीत होत्या आणि "नॅब'च्या कार्यालयात हजर राहण्याच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून त्या कोट लखपतमध्ये आल्या होत्या, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारताने कलम 370 रद्द केल्यानंतर मरियम यांनी प्रतिक्रिया देताना 'काश्‍मीरचा पाडाव' झाल्याचे सांगत या प्रकरणाला पंतप्रधान इम्रान खान जबाबदार असल्याची टीका केली होती, तसेच त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी काल (ता. 7) केली होती. त्यांनी अनेक वेळा पाकिस्तानी लष्करावरही टीका केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com