भोकरदनच्या शिवसैनिकांनी संजय राऊत यांना दिला राजुरेश्वराचा प्रसाद

गेल्या महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्यात राऊत महत्वाची भूमिका बजावत आहेत. भोकरदनमधील शिवसैनिकांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच राज्यात शिवसेनाचा मुख्यमंत्री करण्यात राऊत यांना यश मिळावे यासाठी राजुरेश्‍वराच्या चरणी प्रार्थना केली. त्याचा प्रसाद घेऊन या शिवसैनिकांनी नुकतीच संजय राऊत यांची मुंबईत भेट घेतली.
Bhokardan Shivsena Workers Gives Blessings to Sanjay Raut
Bhokardan Shivsena Workers Gives Blessings to Sanjay Raut

भोकरदन : गेल्या महिनाभरात महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्यात राऊत महत्वाची भूमिका बजावत आहेत.

मानसिक तणाव आणि दगदगीमुळे त्यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी देखील करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर भोकरदनमधील शिवसैनिकांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच राज्यात शिवसेनाचा मुख्यमंत्री करण्यात राऊत यांना यश मिळावे यासाठी राजुरेश्‍वराच्या चरणी प्रार्थना केली. त्याचा प्रसाद घेऊन या शिवसैनिकांनी नुकतीच संजय राऊत यांची मुंबईत भेट घेतली.

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजप शिवाय राज्या सत्ता स्थापनेच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वय साधण्याचा महत्वाचा रोल राऊत साकारत आहेत. ताण, तणाव आणि राजकीय डावपेंचाच्या या धामधुमीत राऊत यांना रुग्णालयामध्ये भरती देखील व्हावे लागले.

नुकताच संजय राऊत यांचा वाढदिवस देखील झाला. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात सध्या राऊत याचे चाहते आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन मतदारसंघात देखील राऊत यांच्या चाहत्यांची कमी नाही याची प्रचिती नुकतीच आली.

भोकदन येथील शिवसैनिक तथा बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराचे अध्यक्ष महेश पुरोहित, उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, शहरप्रमुख भूषण शर्मा व सुरेश तळेकर यांनी संजय राऊत यांच्या दिर्घायुष्यासाठी महामृत्युंजय जप केला. शिवाय राजुर येथील राजुरेश्‍वर गणपती मंदीरात साकडे घालून राजुरेश्‍वराचा प्रसाद घेऊन हे सगळे मुंबईला गेले. प्रभादेवी येथील सामना कार्यालयात त्यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची अस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच राजूरच्या गणपतीचा प्रसाद देखील त्यांना दिला. यावेळी भोकरदन मतदारसंघातील शिवसेनेचा कार्य अहवाल देऊन राजकीय विषयावर राऊत यांच्यांशी चर्चा देखील केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com