मतदारसंघाच्या चौफेर विकासाचा 'अभिमन्यू संकल्प'

औसा विधानसभा मतदारसंघ अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीमुळे राज्यात चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक म्हणून काम करीत असताना त्यांनी कोट्यावधीचा निधी या मतदारसंघात आणला आणि नंतर उमेदवारी घेतली. आधी करुन दाखवले आणि नंतर जनतेसमोर आले, असे काहीसे त्यांच्या बाबतीत घडले.
Ausa BJP Candidate Abhumany Pawar Election Campaign
Ausa BJP Candidate Abhumany Pawar Election Campaign

लातूर : औसा विधानसभा मतदारसंघ अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीमुळे राज्यात चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक म्हणून काम करीत असताना त्यांनी कोट्यावधीचा निधी या मतदारसंघात आणला आणि नंतर उमेदवारी घेतली. आधी करुन दाखवले आणि नंतर जनतेसमोर आले, असे काहीसे त्यांच्या बाबतीत घडले.

या मतदारसंघात 'भूमिपूत्र" हा विषय चर्चेत राहिला. पवार यांनी देखील आपल्या संकल्प पत्रात भविष्यात मतदारसंघ कसा असेल याचा संकल्प तर केलाच आहे, पण आवर्जून आपले जन्मगाव हे उंबडगा (ता. औसा) असून 'मी भूमिपूत्र... माझा मतदारसंघ, माझा परिवार' असे ठणकावून सांगितले. मतदारसंघाला जलसंपन्न करण्याचा निर्धार, प्रत्येक गावाला शाश्वत व शुद्ध पाणी पुरवठा, ओढे, नाले, नद्यातील गाळ काढून पाणीसाठा वाढवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी आपल्या संकल्प पत्रात म्हटले आहे.

मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडणे, पाणंद रस्त्यांची निर्मिती , नवीन पिढी शारिरीक दृष्ट्या सक्षम घडवण्यासाठी शंभर दिवसाच्या आत क्रीडा संकुलाची उभारणी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्न आणि समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलण्याचा संकल्प पवार यांनी घेतला आहे.

अभिमन्यू हेल्थ कार्ड
मतदारसंघात अद्यावत रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा, मोफत आरोग्य शिबिरे, सुसज्ज रुग्णवाहिका तसेच सवलतीच्या दरात उपचाराकरीता अभिमन्यू हेल्थकार्ड देण्याचा संकल्प पवार यांनी केला आहे.
विद्यार्थ्यांसाठी बाल संस्कार केंद्राची उभारणी, शिक्षणासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा, उच्च शिक्षणाची सोय, सुसज्ज वसतिगृह, अभ्यासिका, वाचनालय तयार करण्याचा मानस असल्याचे पवार सांगतात.

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी दत्तक योजना, शेतीपूरक व्यवसायासाठी पाठबळ देण्याचा प्रयत्न याला प्राधान्य देतांनाच औद्योगिक विकासावरही भर दिला जाणार आहे. औद्योगिक वसाहत निर्माण करतांना त्यात महिला बचतगटांना दहा टक्के जागा राखीव, गृह उद्योगाना चालना,व्यापारी संकुलाची उभारणी, धार्मिक स्थळ आणि पर्यटन विकासावर आपला भर असेल असेही पवार यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com