आमदार नारायण कुचे यांचे 'कुटुंब रंगलय प्रचारात'

बदनापूर विधानसभा मतदार संघातून भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा आमदार नारायण कुचे यांच्या प्रचाराचा झंझावात मतदार संघात दिसून येत आहे. प्रचारासाठी उमेदवार म्हणून नारायण कुचे प्रत्येक गाव, वाडी-तांड्याला भेट देऊन मतदारांशी संवाद साधत असतांनाच त्यांचे अवघे कुचे कुटुंबच प्रचारात उतरले आहे. राजुरेश्वराचे दर्शन घेऊन नारायण कुचे यांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला होता. बदनापूर मतदार संघात सर्कलनिहाय गावांना भेटी देत आमदार कुचे यांनी नियोजनबद्ध प्रचार केला. अर्थात विधानसभा निवडणुकीचा डोलारा मोठा असल्याने त्यांच्या प्रचारात कुटुंबातील सदस्यांनाही उतरावे लागले.
MLA Narayan Kuche Family in Election Campaign
MLA Narayan Kuche Family in Election Campaign

बदनापूर : बदनापूर विधानसभा मतदार संघातून भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा आमदार नारायण कुचे यांच्या प्रचाराचा झंझावात मतदार संघात दिसून येत आहे. प्रचारासाठी उमेदवार म्हणून नारायण कुचे प्रत्येक गाव, वाडी-तांड्याला भेट देऊन मतदारांशी संवाद साधत असतांनाच त्यांचे अवघे कुचे कुटुंबच प्रचारात उतरले आहे. राजुरेश्वराचे दर्शन घेऊन नारायण कुचे यांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला होता. बदनापूर मतदार संघात सर्कलनिहाय गावांना भेटी देत आमदार कुचे यांनी नियोजनबद्ध प्रचार केला. अर्थात विधानसभा निवडणुकीचा डोलारा मोठा असल्याने त्यांच्या प्रचारात कुटुंबातील सदस्यांनाही उतरावे लागले.

आमदार कुचे यांचे मोठे बंधू देविदास कुचे सध्या नियोजनाचे काम पाहत आहेत. त्यांच्या भावजाई संगीता देविदास कुचे या अंबडच्या नगराध्यक्षा आहेत. त्यामुळे त्यांना राजकारणाची चांगलीच जाण असून त्यांचा जनसंपर्क देखील मोठा आहे. या माध्यमातून संगीता कुचे आपल्या नातेवाईकांसह अंबड शहरासह ग्रामिण भागात जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. आमदार कुचे यांच्या पत्नी शितल कुचे या गृहणी आहेत. मात्र, मागील दोन वर्षांपासून आमदार कुचे यांच्या अनुपस्थितीत लग्न-कार्य व इतर मतदारसंघातील सोहळ्यांना हजेरी लावत त्यांनी पती नारायण कुचे यांना खंबीर साथ दिली आहे. सौभाग्यवती आमदार म्हणून त्यांचा देखील महिलांशी चांगला संपर्क आहे. त्याचा लाभ निवडणुकीच्या प्रचारात देखील त्यांना होत आहे. विजयादशमी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शितल कुचे प्रचारासाठी बाहेर पडल्या.

गावागावात जाऊन महिला व पुरुष मतदारांच्या भेटी घेत आमदार कुचे यांनी मतदार संघात राबविलेल्या विकास कामांची माहिती त्या देत आहेत. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेत आहेत. एकूणच निवडणुकीच्या निमित्ताने अवघे कुचे कुटुंब प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे चित्र आहे. शितल कुचे सांगतात, ''आमदार कुचे यांनी बदनापूर मतदार संघात भरीव विकास कामे केली आहेत. त्यामुळे सामान्य मतदारांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकीची भावना आहे. असे कोणतेही गाव नाही ज्या गावात विकास कामे झाली नाहीत. कुचेंचा विकासात्मक दृष्टिकोन व जनसंपर्क त्यांना या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी करणार यात मला तिळमात्र शंका नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com