मराठी नोकरदारांच्या हक्कांसाठी शिवसेनेऐवजी आता मनसे ?

मराठी नोकरदारांच्या हक्कांसाठी शिवसेनेऐवजी आता मनसे ?

मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील बढतीवरील मराठी अधिकाऱ्यांची मुंबईबाहेर बदली करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उधळून लावला आहे. एकेकाळी मराठी माणसांच्या तसेच बँका, रेल्वे आदी आस्थापनांमधील मराठी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची जागा आता मनसेने हळुहळू घेत असल्याचे दिसत आहे अशी  प्रतिक्रिया यामुळे व्यक्त होत आहे.

क्लार्क पदावरून अधिकारी अशी पदोन्नती मिळालेल्या मुंबईतील 17 पैकी 14 जणांची मुंबईबाहेर बदली करण्याचे ठरले होते. मुंबई व चेन्नै विभागात पदोन्नती मिलाळेल्या अधिकाऱ्यांना त्याच प्रादेशिक कार्यालयातील विभागात बदली करण्याबाबतचा करार झाला होता. तरीही बँक प्रशासनाने हा खोडसाळपणा केल्याचे मनसेच्या जनाधिकार सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

जनाधिकार सेनेने या बदलीस हरकत घेतल्यावर त्यातील सहा महिला अधिकाऱ्यांना मुंबईतच ठेवण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. आता उरलेल्या आठ जणांनाही मुंबईत आणण्यासाठी आमचा लढा सुरुच राहील, असेही मनसेच्या पत्रकात म्हटले आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांविरुद्ध असाच अन्याय अन्य सरकारी बँकांमध्येही सुरु असून त्याची माहिती घेऊन तो दूर करण्यासाठी मनसे लढा देईल, असेही किल्लेदार यांनी सांगितले.

या बँकेत गेली तीन- चार वर्षे मुंबईव्यतिरिक्त देशात सर्वत्र कर्मचारी भरती होत आहे. मात्र मुंबईतील कर्मचाऱ्यांचे अस्तित्व पुसण्यासाठी गेली तीन वर्षे मुंबईतच भरती झाली नसल्याचा आरोपही मनसेने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com