JItendra Awhad Criticizes Ranjan Gogoi Appointment on Rajya Sabha
JItendra Awhad Criticizes Ranjan Gogoi Appointment on Rajya Sabha

राज्यसभेत जायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बना! - आव्हाडांचा टोमणा

रामजन्मभूमी वादावर निकाल देणारे माजी सरन्यायाधीशरंजन गोगोई यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून काल घोषणा करण्यात आली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी टिका केली आहे

पुणे : रामजन्मभूमी वादावर निकाल देणारे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून काल घोषणा करण्यात आली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी टिका केली आहे. राज्यसभेत जायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बना, असा टोमणा आव्हाड यांनी ट्वीटरवरुन मारला आहे. 

एका राजपत्राद्वारे गोगोई यांच्या नावाची घोषणा काल सायंकाळी उशिरा झाली. सरन्यायाधीशांनी राज्यसभेवर येण्याची ही पहिलीच घटना आहे. गोगोई यांचा तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेणाऱ्या न्यायाधीशांत समावेश होता. तसेच त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाला होता. राफेलप्रकरणीही त्यांनी निकाल दिला होता. त्यात त्यांनी सरकारला क्लिन चीट दिली होती.

त्यामुळेच आव्हाड यांनी या निर्णयावर टिका केली आहे. राज्यसभेत जायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बना आणि सत्ताधारी खुश होतील असे निर्णय द्या.....बाबासाहेब बघता आहात ना.....वरिष्ठ  सरकारी अधिकारी आणि न्यायाधीश ह्यांना निवृत्ती नंतर १० वर्षे राजकारण प्रवेश बंदी ही काळाची गरज आहे तरच लोकशाही वाचेल, असे आव्हाडांनी म्हटले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com