राहुल गांधींच्या यंग ब्रिगेड मध्ये विदर्भातून यशोमती ठाकूर - Marathi Political News Yashomati Thakur Rahul Gandhi young Brigade | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

राहुल गांधींच्या यंग ब्रिगेड मध्ये विदर्भातून यशोमती ठाकूर

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 एप्रिल 2018

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर तरुण नेत्यांना जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत. विदर्भातून आमदार यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमध्ये स्थान मिळविले आहे. मेघालयनंतर त्यांच्याकडे आता महत्त्वपूर्ण कर्नाटक राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नागपूर : राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर तरुण नेत्यांना जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत. विदर्भातून आमदार यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमध्ये स्थान मिळविले आहे. मेघालयनंतर त्यांच्याकडे आता महत्त्वपूर्ण कर्नाटक राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राहुल गांधींकडे पक्षाची सूत्रे आल्यानंतर प्रस्थापितांना धक्के बसणे सुरू झाले आहे. राहुल गांधी यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती, तेव्हापासून विदर्भातून निलेश पारवेकर (यवतमाळ) व यशोमती ठाकूर (अमरावती) या राहुल गांधी यांच्या जवळच्या गोटात होते. निलेश पारवेकर यांचे अपघाती निधन झाले. पारवेकर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी यवतमाळला गेले होते. यावेळी यशोमती ठाकूर त्यांच्यासोबत होत्या. यशोमती ठाकूर अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेल्या आहेत. मराठीसोबतच त्यांचे हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभूत्व आहे.

काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे मेघालय राज्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तेथील उमेदवारांची निवड करणे व राहुल गांधी यांच्या जाहीरसभा ठरविण्यासाठी यशोमती ठाकूर जवळपास दोन महिने मेघालयात तळ ठोकून होत्या. या काळात त्यांच्या कारवर तेथील दहशतवादी गटाने हल्ला केला होता. मेघालयमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी सत्ता मिळू शकली नाही. त्यांच्या या कामाची दखल घेऊन राहुल गांधींनी अ. भा. काँग्रेस समितीच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती केली. कर्नाटक राज्याच्या सहप्रभारी म्हणून त्यांच्याकडे काम सोपविण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये येत्या 12 मे रोजी निवडणुका होणार आहे. सध्या विदर्भातून यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधींच्या निकटच्या गोटात स्थान मिळविले असल्याचे बोलले जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख