राधाकृष्ण विखे पाटलांच्या दौऱ्यातून शिवाजीराव मोघे गटाची ‘एक्झीट’

काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूबिंयाचे सांत्वन करण्यासाठी जिल्ह्यात आले होते. त्यांनी आर्णी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या राजुरवाडी येथे भेट दिली. मागील काही दिवसापुर्वी सरकार विरोधात पदयात्रा काढणारे माजी मंत्री शिवाजीराव मोघे गटाने यावेळी विरोधीपक्ष नेत्यांच्या दौऱ्यापासून लांब राहणेच पसंत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
राधाकृष्ण विखे पाटलांच्या दौऱ्यातून शिवाजीराव मोघे गटाची ‘एक्झीट’

यवतमाळ : काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूबिंयाचे सांत्वन करण्यासाठी जिल्ह्यात आले होते. त्यांनी आर्णी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या राजुरवाडी येथे भेट दिली. मागील काही दिवसापुर्वी सरकार विरोधात पदयात्रा काढणारे माजी मंत्री शिवाजीराव मोघे गटाने यावेळी विरोधीपक्ष नेत्यांच्या दौऱ्यापासून लांब राहणेच पसंत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपविली. या शेतकरी कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील जिल्ह्यात आले. त्यांनी उमरखेड तालुक्यातील सावळेश्‍वर तसेच शिवाजीराव मोघे यांचा परपंरागत मतदारसंघ असलेल्या घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथे भेट दिली. काही दिवसापुर्वीच सरकार विरोधात पदयात्रा काढणारे शिवाजीराव मोघे यांनी या दौऱ्यातून ‘एक्झीट’ घेतल्याने अनेक चर्चा सुरु झाल्या. विशेष म्हणजे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सोबत माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्यासह आर्णी, घाटंजी तालुक्यातील अनेक पदाधिकारी विखे पाटलांच्या दौऱ्यापासून दोन ‘हात’ लांबच होते. 

कारण गुलदस्तात
काँग्रेस पक्षाचे विधानसभेतीत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील जिल्हा दौऱ्यावर असताना जिल्ह्यातील काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनीच पाठ दाखविल्याचे कारण गुलदस्तात आहे. 2019 मध्ये हाेणाऱ्या लाेकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षातंर्गत असलेले गटा-तटाचे राजकारण विसरा असे राज्यस्तरावरील नेत्यांचे आवाहन असले तरी जिल्ह्यात मात्र गटा-तटाचे राजकारण सुरुच असल्याचे या घटनेवरुन पुन्हा एकदा दिसून आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com