विखे पाटलांच्या लोणीमध्ये आदल्या दिवशी मारामारी दुसऱ्या दिवशी एकत्रित चहापान 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी बुद्रुक गावाजवळच असलेल्या लोणी खुर्द (ता. राहाता) येथे एका सभागृहाला नाव देण्यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. मिटून घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने अखेर रात्री उशिरा सत्ताधाऱ्यांवर गु्न्हे दाखल झाला. आज दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या मध्यस्थीने गाव बंदचे आवाहन मागे घेवून वाद परस्पर मिटून टाकले. एव्हढेच नव्हे, तर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित चहापानही केले.
विखे पाटलांच्या लोणीमध्ये आदल्या दिवशी मारामारी दुसऱ्या दिवशी एकत्रित चहापान 

नगर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी बुद्रुक गावाजवळच असलेल्या लोणी खुर्द (ता. राहाता) येथे एका सभागृहाला नाव देण्यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. मिटून घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने अखेर रात्री उशिरा सत्ताधाऱ्यांवर गु्न्हे दाखल झाला. आज दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या मध्यस्थीने गाव बंदचे आवाहन मागे घेवून वाद परस्पर मिटून टाकले. एव्हढेच नव्हे, तर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित चहापानही केले.

लोणी ग्रामपंचायतीत विखे पाटील यांच्या गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे. सरपंच मनिषा आहेर या विखे गटाच्या आहेत. त्यांच्या विरोधात एकनाथ घोगरे हे राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त काल दुपारी लोणी येथे ग्रामसभा झाली. या वेळी ग्रामपंचायतीच्या एका सभागृहास या मतदारसंघाचे पहिले आमदार (कै.) चंद्रभान घोगरे यांचे नाव नाव द्यावे, अशी सूचना एकनाथ घोगरे यांच्यावतीने करण्यात आली. त्याला सत्ताधारी गटाच्या डाॅ. हरिभाऊ आहेर यांनी विरोध केला. आपण हा निर्णय सर्वानुमते घेवू, हवे तर मतदान घेवून निर्णय घेवू असे डाॅ. आहेर यांनी सांगताच एकनाथ घोगरे यांनी डाॅ. आहेर यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर किरकोळ मारामारी होऊन ग्रामसभेत तणाव निर्माण झाला. 

दरम्यान, हा वाद स्थानिक पातळीवर मिटविण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला. परंतु रात्री राष्ट्रवादीच्या गटाच्या श्रीकांत मापारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डाॅ. हरिभाऊ आहेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. तसेच सरकारी कामात अडथळा आणला म्हणून ग्रामसेवक संतोष थिगळे यांनीही काही लोकांविरुद्ध फिर्याद देऊन काही लोकांविरुद्ध गु्न्हे दाखल केले.

अखेर वाद मिटला
आज बुधवारी सकाळी सत्ताधाऱ्यांनी निषेध सभा घेण्याचे ठरविले. त्यावर विरोधकांनी निषेध सभा नव्हे, तर गाव बंदचे आवाहन केले. त्यानुसार आज सकाळपासून लोणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. पोलिसांच्या मदतीने पुन्हा दोन्ही बाजुंची एकत्रित बैठक घेवून या वादावर पडदा पाडायचे ठरविले. अखेकर गाव बंदचे आवाहन मागे घेवून दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांनी एकत्रिच चहापान करुन वादाला तिलांजली दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com