Marathi Political News Tukaram Mundhe Street Lights | Sarkarnama

तुकाराम मुंढे इफेक्ट ; सोनसाखळी चोरीच्या ठिकाणी तासातच उजळले पथदिवे 

संपत देवगिरे 
मंगळवार, 24 एप्रिल 2018

शहरात सध्या सोनसाखळी चोरांचा उच्छाद आहे. कुठेही, केव्हाही हे प्रकार घडतात. गेल्या आठवड्यात शहरातील उत्तरा नगर या भागात एका ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी खेचली गेली. ज्या वेळी ही घटना घडली, त्यावेळी गल्लीतील पथदिवे बंद होते. राजकीय नेते, नगरसेवक यांच्याकडे नागरिकांनी दोन दिवस हेलपाटे घातले. मात्र अंधार कायमच होता. अखेर एका नागरिकाला महापालिका 'ई कनेक्‍ट ऍप'ची आठवण झाली. त्यावर तक्रार केली गेली अन्‌ तासाभरात गल्लीचे पथदीप अन्‌ नागरीकांचे चेहरेही उजळले. 

नाशिक : शहरात सध्या सोनसाखळी चोरांचा उच्छाद आहे. कुठेही, केव्हाही हे प्रकार घडतात. गेल्या आठवड्यात शहरातील उत्तरा नगर या भागात एका ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी खेचली गेली. ज्या वेळी ही घटना घडली, त्यावेळी गल्लीतील पथदिवे बंद होते. राजकीय नेते, नगरसेवक यांच्याकडे नागरिकांनी दोन दिवस हेलपाटे घातले. मात्र अंधार कायमच होता. अखेर एका नागरिकाला महापालिका 'ई कनेक्‍ट ऍप'ची आठवण झाली. त्यावर तक्रार केली गेली अन्‌ तासाभरात गल्लीचे पथदीप अन्‌ नागरीकांचे चेहरेही उजळले. 

उत्तरा नगर येथील साईबाबा मंदिरालगतच्या लेनमध्ये पथदीप बंद होते. त्याचा गैरफायाद घेत सायंकाळी सातला एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी खेचण्यात आली. पोलिस आले. नगरसेवकांनी भेट दिली. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी भेट देऊन गेले. महिलांनी पथदिव्यांची तक्रार केली मात्र काहीच झाले नाही. गल्लीतला अंधार तसाच होता. महिला धास्तीने वावरत होत्या. येथील एका रहिवाशाने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेल्या 'ई कनेक्‍ट' ऑनलाईन तक्रार निवारण अॅप'वर तक्रार नोंदवली. अन्‌ तासाभरात त्यांना दुरध्वनी आला. 'आपण केलेली तक्रार तपासली. केबल खराब होती. ती दुरुस्त केली आहे. पथदीप सुरु झाले आहेत. आपली अन्य काही सुचना आहे का?.' त्या नागरिकाचा आपल्या कानावर विश्‍वासच बसत नव्हता. आपण महापालिकेशी संपर्क केला एखाद्या खासगी कार्पोरेट संस्थेशी, असा प्रश्न त्यांना पडला. हा अनुभव त्यांनी अनेकांशी शेअर केला. 

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामकाजावरुन सर्वच राजकीय नेते, महापालिका पदाधिकारी, नगरसेवक नाराज आहेत. कुणी उघडपणे बोलत नसले तरी मनातुन नाराज असतात. मात्र, नागरीकांना मुंढे यांचा वेगळाच अनुभव येतो. 'वॉक वीथ कमिशनर' उपक्रमासाठी झालेल्या गर्दीने त्याची प्रचिती आली. लहान सहान कामांसाठीही नगरसेवक, राजकीय नेत्यांच्या पुढे मागे फिरण्याची पध्दत रुढ झाली आहे. आयुक्त मुंढे यांच्या कामकाज पध्दतीने या नेत्यांभोवती गर्दी राहते की नाही याची अनेकांना चिंता आहे. या चिंतेतुनच मुंढे यांना विरोध होऊ लागला आहे. मात्र अंतिमतः कारभार महत्वाचा की राजकीय नेत्यांचा मानमरातब हा खरा प्रश्न आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख