Marathi Political News Tukaram Mundhe Plastic Ban Nashik | Sarkarnama

तुकाराम मुंढे म्हणाले - प्लास्टिकबंदी होईलच, हवे तर मी पुड्या बांधुन दाखवतो 

संपत देवगिरे 
बुधवार, 11 एप्रिल 2018

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कडक शिस्तीचे प्रशासक म्हणुन ख्याती असलेले मुंढे त्यावर देखरेख ठेवत आहेत. त्यामुळे महापालिका अधिकारी त्याबाबत गांभिर्याने कार्यवाही करीत आहेत. उल्लंघन करणाऱ्यांवर एक एप्रिलपासून दंड वसुल केला जात आहे. यासंदर्भात महापालिकेने जाहिरात देऊन 22 एप्रिलपर्यंत संबंधिताकंडे असलेला प्लास्टिक साठा संकलन केंद्रावर जमा करण्याचे आवाहन जाहिरातीतून करण्यात आले आहे.

नाशिक : "राज्यात प्लास्टिकबंदी करण्यात आली आहे. हा राज्य सरकारचा निर्णय आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने देखील तो आवश्‍यक आहे. त्यामुळे शासनाचा प्रतिनिधी म्हणुन मी त्याची अंमलबजावणी करीन. व्यापाऱ्यांनी त्याचे पर्याय स्वतः शोधावेत. हवे तर मी पुड्या बांधुन दाखवितो," या शब्दांत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्लास्टिकबंदीला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला सुनावले. 

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कडक शिस्तीचे प्रशासक म्हणुन ख्याती असलेले मुंढे त्यावर देखरेख ठेवत आहेत. त्यामुळे महापालिका अधिकारी त्याबाबत गांभिर्याने कार्यवाही करीत आहेत. उल्लंघन करणाऱ्यांवर एक एप्रिलपासून दंड वसुल केला जात आहे. यासंदर्भात महापालिकेने जाहिरात देऊन 22 एप्रिलपर्यंत संबंधिताकंडे असलेला प्लास्टिक साठा संकलन केंद्रावर जमा करण्याचे आवाहन जाहिरातीतून करण्यात आले आहे. त्यासंदर्भात व्यापाऱ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शेखर दसपुते यांनी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह आयुक्तांची भेट घेऊन सवलत देण्याची मागणी केली. 

यावेळी काही व्यापाऱ्यांनी मालाचे पुडे कसे बांधायचे, ही समस्या मांडली. त्यावर आयुक्त मुंढे "मी सरकारी कर्मचारी आहे. आदेशाची अंमलबजावणी करणे माझे काम आहे. त्यामुळे मार्ग कसा काढायचा हे तुम्ही बघा. हवे तर मी पुडे बांधुन दाखवतो." असे सांगत व्यापाऱ्यांना निरुत्तर केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख