सुप्रियाताई जेव्हा पैठण्यांच्या विश्वात हरवतात..... - Marathi Political News Supriya Sule Paithani | Politics Marathi News - Sarkarnama

सुप्रियाताई जेव्हा पैठण्यांच्या विश्वात हरवतात.....

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

पैठणी म्हणजे महाराष्ट्राच्या राजेशाही अन्‌ पारंपारीक संस्कृतिच साज, बाज अन्‌ इतिहास देखील. या पैठणीचे गाव म्हणजे येवला. येवला आता जगाच्या पाठीवर सगळीकडे पैठणीसाठीच परिचीत आहे. त्यामुळे येवल्याला आलेले नेते, अभिनेतेच देखील पैठणीची चौकशी करायला विसरत नाहीत. त्याला खासदार सुप्रिया सुळे तरी कशा अपवाद ठरणार. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने येथे आलेल्या खासदार सुळे यांनी सकाळी थोडा वेळ मिळताच येथील भांडगे पैठणी केंद्रास भेट दिली.

येवला : "माझ्या लग्नात आई- बाबांनी खुप हौसेने पैठणी आणली होती. ती नेसल्यावर पैठणीची कलाकुसर मला एव्हढी भावली की ती शब्दात सांगता येणार नाही. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघात भाषणाला गेले तेव्हा आवर्जुन मी पैठणीच परिधान केली होती," असे सांगत एरव्ही राजकारण आणि लोकांत रमणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे पैठणींच्या कलात्मक व मोरपंखी पैठण्यांच्या विश्‍वात काही काळ हरवून गेल्या होत्या.  

पैठणी म्हणजे महाराष्ट्राच्या राजेशाही अन्‌ पारंपरिक संस्कृतीचा साज, बाज अन्‌ इतिहास देखील. या पैठणीचे गाव म्हणजे येवला. येवला आता जगाच्या पाठीवर सगळीकडे पैठणीसाठीच परिचीत आहे. त्यामुळे येवल्याला आलेले नेते, अभिनेतेच देखील पैठणीची चौकशी करायला विसरत नाहीत. त्याला खासदार सुप्रिया सुळे तरी कशा अपवाद ठरणार. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने येथे आलेल्या खासदार सुळे यांनी सकाळी थोडा वेळ मिळताच येथील भांडगे पैठणी केंद्रास भेट दिली. तिथल्या पैठणींच्या कलाकुसरीत त्या हरवून गेल्या. 

पैठणी नेमक्‍या किती प्रकारची, कशी विणली जाते, त्यांची नक्षी, रचना, इतिहास, या व्यवसायात असलेल्या महिला या सगळ्यांची विचारणा त्यांनी केली. काही वेळ जायचे म्हणुन गेलेल्या सुप्रियाताई तब्बल चार तास येथे रमल्या. भांडगे पैठणीचे संचालक राजेश भांडगे, पप्पू भांडगे यांनीही त्यांना विविध माहिती दिल्यावर सुप्रियाताईंनी बांगडा नक्षीची पैठणी नेसूनही पाहिली. त्यानंतर मात्र त्यांचा चेहरा चांगलाच खुलला होता. 

यावेळी त्या म्हणाल्या, "पैठणी महाराष्ट्रीय कलात्मक साड्यांमधले वैशिष्ट्य आहे. अनेकांचा विश्‍वास बसणार नाही, पण मी जेव्हा परदेशात जाते तेव्हा आवर्जून पैठणी नेसते. एकदा तर न्युयॉर्क मध्ये पायी फेरफटका मारतांना अनेकांनी कौतुकाने पैठणी पहात मला थांबवले होते. 'ही कशी नेसतात. किती सुंदर आहे. आम्हालाही नेसण्याची इच्छा आहे,' असे अनेक अमेरिकन महिलांनी कुतुहलाने मला विचारले होते.

पैठणीतील अप्रतिम नक्षीकाम अन्यत्र कुठेही पाहिले नाही. जे कारागीर हे करतात त्यांचा खरोखर अभिमान वाटतो. पैठणीची परंपरा जतन केली पाहिजे -  खासदार सुप्रिया सुळे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख