आमदार सीमा हिरेंनी उभारल्या छप्पन्न ग्रीन जीम  - Marathi Political News Seem Hire Green Gym Nashik | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार सीमा हिरेंनी उभारल्या छप्पन्न ग्रीन जीम 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 21 एप्रिल 2018

शहरात बहुतांश ज्येष्ठ नागरिक, महिलांचा दिनक्रम सकाळच्या व्यायामाने सुरु होतो. त्यामुळे नगरसेवक, आमदारांनाही मतदारांच्या समाधानासाठी व्यायामाच्या सुविधांचा विचार करावा लागत आहे. येथील नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी आपल्या मतदारसंघात तब्बल छपन्न ग्रीन जीम सुरु केल्या आहेत.

नाशिक : शहरात बहुतांश ज्येष्ठ नागरिक, महिलांचा दिनक्रम सकाळच्या व्यायामाने सुरु होतो. त्यामुळे नगरसेवक, आमदारांनाही मतदारांच्या समाधानासाठी व्यायामाच्या सुविधांचा विचार करावा लागत आहे. येथील नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी आपल्या मतदारसंघात तब्बल छपन्न ग्रीन जीम सुरु केल्या आहेत.

शहरातील जाॅगींग ट्रॅक, उद्याने तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या आवरात व थोड्याश्या मोकळ्या जागेतही ग्रीन जीम उभारता येते. तीन ते चार सोप्या व लहान साधनांतुन ग्रीन जीमची उभारणी होते. त्याला तीन लाखांचा खर्च येतो. परिसरातील नागीरकांच्या मागणीनुसार या जीम उभारण्यात आल्याने नागरिक, महिला, युवक सगळेच त्याचा उपयोग करतात. त्यामुळे त्याची उपयुक्तता मोठी आहे. त्याबाबत नागरीकांच्या अतिशय चांगल्या प्रतिक्रिया असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख