सपना मुनगंटीवार यांची तिरुपती देवस्थानवर निवड - Marathi Political News Sapna Mungatiwar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

सपना मुनगंटीवार यांची तिरुपती देवस्थानवर निवड

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 23 एप्रिल 2018

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती येथील तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्‍वस्तपदी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांची निवड झाली आहे. आंध्रप्रदेश सरकारने जारी केलेल्या 18 सदस्यांच्या यादीत सपना मुनगंटीवार यांचाही समावेश आहे.

नागपूर : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती येथील तिरुमला तिरुपती देवस्थानच्या विश्‍वस्तपदी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार यांची निवड झाली आहे. आंध्रप्रदेश सरकारने जारी केलेल्या 18 सदस्यांच्या यादीत सपना मुनगंटीवार यांचाही समावेश आहे.

पुट्टा सुधाकर यादव यांची तिरुपती देवस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची अधिसूचना 20 एप्रिल 2018 रोजी जारी करण्यात आली. आंध्रप्रदेश सरकारच्या महसूल विभागाने जारी केलेल्या यादीत प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांचाही समावेश केला आहे. सुधीर मुनगंटीवार हे तिरुपतीचे निःस्सीम भक्त असून मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तिरुपतीचे दर्शन घेण्यासाठी ते विशेष विमानाने गेले होते. 

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सपना मुनगंटीवार म्हणाल्या, ''तिरुमलावर आमची श्रद्धा आहे. आंध्रप्रदेश सरकारने या प्रतिष्ठित देवस्थानवर माझी सदस्य म्हणून निवड केल्याबद्दल आनंद झाला. या देवस्थानतर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांना अधिक लोकाभिमुख करण्यासाठी आपला प्रयत्न राहील," 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख