कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर रविकांत तुपकर 'डिजे'च्या तालावर थिरकले 

राजकीय नेत्यांसाठी लोकसंपर्क हा महत्वाचा असतो. ज्यांचा लोकसंपर्क जास्त त्यांच्या निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुकर होतो. यासाठी नेते सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला जपण्याचे काम यशस्वीपणे करण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर करीत आहेत.
कार्यकर्त्यांच्या प्रेमाखातर रविकांत तुपकर 'डिजे'च्या तालावर थिरकले 

अकोला : सळसळत्या तरूणाईचा उत्साह...डिजेवर नाचणारी मुलं....तेवढ्यात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची मिरवणुकीत एन्ट्री होते.....जिवलग कार्यकर्ता असलेल्या नवरदेवाची एकच इच्छा रविभाऊ तुम्ही नाचा...अन् कार्यकर्त्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी रविकांत तुपकर हे डिजेच्या गाण्यावर ठेका धरतात...काही उत्साही कार्यकर्ते तुपकरांना खांद्यावर घेऊन नाचायला सुरूवात करताच रविकांत यांच्यातील डान्सर जागा होत संपुर्ण मिरवणुकीत प्रचंड उत्साह संचारतो.....

राजकीय नेत्यांसाठी लोकसंपर्क हा महत्वाचा असतो. ज्यांचा लोकसंपर्क जास्त त्यांच्या निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुकर होतो. यासाठी नेते सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला जपण्याचे काम यशस्वीपणे करण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रयत्न स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर करीत आहेत. पश्चिम विदर्भात शेतकरी लढ्यातुन आपल्या राजकीय जीवनाला सुरूवात करणारे रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातुन सत्ताधारी भाजप समोर मोठे आव्हान उभे केले आहे. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेला महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपदा सोडत त्यांनी खासदार राजु शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांवरील आपली निष्ठा कायम ठेवली. 

त्यामुळे खासदार शेट्टींनी तुपकरांना स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लावत त्यांच्या एकनिष्ठतेचा गौरव केला. प्रदेशाध्यक्ष पदाची महत्वपुर्ण जबाबदारी  मिळाल्यावर राजकीय पटलावर तुपकरांचे महत्व वाढले आहे. मात्र, निष्ठावंत व सक्रीय कार्यकर्ते हीच मुळ ताकत असल्याचे ओळखणारे तुपकर यांनी आजही सर्वसामान्यांची आपली नाळ जोडून ठेवत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न अविरत सुरू ठेवला आहे. सोमवारी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना डोंगरशेवडी येथील संदीप सावडे या कार्यकर्त्याचा तुपकरांना फोन आला. 'भाऊ तुम्ही नक्की या...मी वाट पाहतोय..' अशी हाक जिवलग कार्यकर्ता असलेल्या नवरदेवाने दिली. आणि मग...बैठका आटोपत्या घेत रविकांत तुपकरांनी थेट ओरंगाबाद जिल्ह्यातील अन्वी गाठले. 

तुपकर येतात नवरदेवाचा उत्साह संचारला आणि 'रविभाऊ थोडं नाचा...' अशी विनंती केल्यावर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तुपकरांनी डिजेवर ठेका धरला. तुपकर नाचत असतानाच काही उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर घेतले अन् तुपकरांनीही धम्माल डान्स करीत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com