राहुल गांधीनी मला शाबासकी दिली : नयना गावित  - Marathi Political News Rahul Gandhi Nayna Gavit | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधीनी मला शाबासकी दिली : नयना गावित 

संपत देवगिरे 
शनिवार, 14 एप्रिल 2018

''महाराष्ट्रातील नऊ काँग्रेस सदस्य पक्षाच्या पंचायत राज बैठकीत सहभागी झाले होते. यामध्ये आदिवासी सरपंच, 'पेसा' कायदा व युवकांना येणाऱ्या अडचणींबाबत मी केलेल्या मांडणीने पक्षाध्यक्ष राहूल गांधींनी समाधान व्यक्त केले. लोकांमध्ये जाऊन पक्षाचे काम करा असे सांगत त्यांनी शाब्बासकी दिल्याने भारावून गेले," असे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

नाशिक : ''महाराष्ट्रातील नऊ काँग्रेस सदस्य पक्षाच्या पंचायत राज बैठकीत सहभागी झाले होते. यामध्ये आदिवासी सरपंच, 'पेसा' कायदा व युवकांना येणाऱ्या अडचणींबाबत मी केलेल्या मांडणीने पक्षाध्यक्ष राहूल गांधींनी समाधान व्यक्त केले. लोकांमध्ये जाऊन पक्षाचे काम करा असे सांगत त्यांनी शाब्बासकी दिल्याने भारावून गेले," असे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

ग्रामीण भागात काँग्रेस पक्ष संघटनात्मक स्तरावर बळकट करण्यासाठी पंचायत राज टीम कार्यक्षम करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील पंचायत राज संस्थांत काम करणाऱ्यांना दिल्लीत निमंत्रीत करण्यात आले होते. यामध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित, रेखा पवार यांसह नऊ सदस्यांचा सहभाग होता. या सर्व सदस्यांच्या अपेक्षा व सुचना राहुल गांधी यांनी गांभिर्याने ऐकल्या. गावित यांनी आम्ही पदाधिकारी आहोत. मात्र सरकारने आमचे अधिकारच काढुन घेतले आहेत, असे सांगितले. सदस्यांनी कथन केलेले अनुभव आणि सुचनांचे राहूल गांधींनी कौतुक केल्याचे गावित म्हणाल्या. 

तुमचे निरिक्षण चांगले आहे. मात्र केवळ पंचायत राज संस्थांच नव्हे अगदी आमदार, खासदारांचे अधिकार या सरकारने कमी केले आहे. कोणालाही बोलण्याची परवानगी नाही. आपण विरोधात असल्याने याविरोधात काम करतांना खुप अडचणी येणार आहेत. त्यासाठी तयार रहा. पूर्वी काँग्रेस पक्ष दिल्लीतील मोजक्‍या लोकांच्या सल्ल्याने उमेदवारी देत होता. आता अनुभवी व पंचायत राज संस्थांत काम केलेल्यांनाच विधानसभा, लोकसभेसाठी उमेदवारी देण्याचा विचार होईल, असेही राहुल गांधी यांनी सांगितल्याची माहिती गावित यांनी दिली. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख