होमपिचवर पंकजा मुंडेंचा ‘गांव तिथे विकास’ दौरा - Marathi Political News Pankaja Munde Tour Beed | Politics Marathi News - Sarkarnama

होमपिचवर पंकजा मुंडेंचा ‘गांव तिथे विकास’ दौरा

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 एप्रिल 2018

मधल्या काळात अर्ध्यावर सोडलेला राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचा ‘गाव तिथे विकास दौरा’ आता परळी मतदार संघात जोरात सुरु आहे. दोन दिवसांत त्यांनी मतदार संघातील १७ गावांत २५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद॒घाटन केले. या निमित्ताने पंकजा मुंडे मतदार आणि विशेषत: महिला वर्गांशी संवाद साधत आहेत.

बीड : मधल्या काळात अर्ध्यावर सोडलेला राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचा ‘गाव तिथे विकास दौरा’ आता परळी मतदार संघात जोरात सुरु आहे. दोन दिवसांत त्यांनी मतदार संघातील १७ गावांत २५ कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद॒घाटन केले. या निमित्ताने पंकजा मुंडे मतदार आणि विशेषत: महिला वर्गांशी संवाद साधत आहेत.

  
राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या परळी या होमपिचवर गाव तिथे विकास दौरा सुरु केला होता. पण, इतर कार्यक्रमांमुळे त्यांनी हा अर्धवट सोडलेला दौरा सोमवार पासून पुन्हा सुरु झाला आहे. त्या मतदार संघातील गावांमध्ये विकास कामांच्या निमित्ताने जात मतदारांशी संवादही साधत आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी खास विवकास कामांचा लेखा जोखा असलेला विकास रथ तयार करण्यात आला असून त्यावर उभ्या राहून त्या गावात प्रवेश करतात. तसेच, मतदारांना अभिवादन करत आहेत. तसेच, गावांगावात त्यांचे लेझीम पथके, ढोल ताशे वाजवत स्वागत होत आहे. त्यांनी आतापर्यंत १७ गावांत २५ कोटी रुपयांच्या कामांची सुरुवात या माध्यमातून केली आहे. 

 

दरम्यान, या निमित्ताने त्या महिला वर्गांशी संवाद साधत असून वृद्ध महिला त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवताना पंकजा मुंडे भाऊक झाल्याचे छायाचित्रेही सोशल मिडीयावर दिसत आहेत. बंजारा समाजाच्या महिला पारंपरिक वेशभूषेत पंकजा मुंडेंचे औक्षण करत आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख