Marathi Political News Nashik Beggers Makeover | Sarkarnama

पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याकडून भिकाऱ्यांचे 'मेकओव्हर'

संपत देवगिरे
मंगळवार, 8 मे 2018

लोकसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांसाठी पोलिस आयुक्त रवीद्र सिंघल सातत्याने विविध उपक्रम राबवितात. आता शहर भिकारीमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. काली त्यांनी नाशिकमधील जवळपास सर्व भिका-यांना एकत्र करुन त्यांच्या स्नानाची व्यवस्था केली. त्यांचे केस कापायला लावले. नवे कपडे व भोजन देत त्यांना भिक्षा मागण्यापासुन परावृत्त करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले. त्यांची ही धडपड पाहून नागरिक सुखावले.

नाशिक : लोकसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांसाठी पोलिस आयुक्त रवीद्र सिंघल सातत्याने विविध उपक्रम राबवितात. आता शहर भिकारीमुक्त करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. काली त्यांनी नाशिकमधील जवळपास सर्व भिका-यांना एकत्र करुन त्यांच्या स्नानाची व्यवस्था केली. त्यांचे केस कापायला लावले. नवे कपडे व भोजन देत त्यांना भिक्षा मागण्यापासुन परावृत्त करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले. त्यांची ही धडपड पाहून नागरिक सुखावले.

शहरातल्या पोलिस गाड्या आज गोदाघाटावरील मंदिरांपासून तर विविध सिग्नलवर फिरल्या त्या या भिका-यांना गाडीत भरण्यासाठी. गाडीत बसवुन पोलिस मुख्यालयात आणल्यावर या सगळ्यांचे केस कर्तन करण्यात आले. त्यांना साबण व तेल देऊन स्नान करायला लावले गेले. त्यांना नवे कपडे दिले. त्यानंतर त्यांना भोजन देण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल जातीने हजर होते. ते सतत सुचना करत होते. सोपस्कार पार पाडून भिका-यांचे 'मेकओव्हर' झाल्यावर त्यांना भिक्षा मागणे हा कायद्याने गुन्हा आहे, याची जाणीव करुन देत भिक्षा मागण्यापेक्षा चांगले आयुष्य जगा असे आवाहन त्यांनी केले.

यातील अनेक भिकारी अंघोळ, कपडे, केस कापल्यानंतर झकपक व धडधाकट दिसत होते. केवळ सवय आणि ऐदीपणामुळे आपण भिक्षा मागतो, असे यातील अनेकांनी स्पष्ट केले. गंमत म्हणजे अनेकांचा विवाहही झाल्याचे दिसले. काहींना मुलंबाळंही होती. या लहानग्यांचा उपयोग भिक्षेसाठी केला जातो हे त्यांनी सांगितल्यावर आयुक्त व अन्य पोलिस अधिका-यांनी यापुढे पुन्हा भिक्षा मागितल्यास कारवाई करु असा इशारा दिल्याने यातील अनेकांनी भिक्षा मागणार नाही असे सांगितले. हा उपक्रम किती यशस्वी होतो हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, नागरीकांना त्रस्त करणारा हा प्रकार पोलिसांच्या रडावर आला हे मात्र दिलासादायक आहेच.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख