आत्महत्या ही जागतिक समस्या - मध्य प्रदेशच्या कृषिमंत्र्यांचे वक्तव्य : म्हणे शेतकऱ्यांशी संबंध नाही 

आत्महत्या ही जागतिक समस्या आहे. उद्योगपतींपासून पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत सारेच जण आत्महत्या करतात. जो आत्महत्या करतो त्यालाच आत्महत्येचे कारण माहीत असते, असे विधान मध्य प्रदेशचे कृषिमंत्री बाळकृष्ण पाटिदार यांनी केले आहे. मध्य प्रदेशात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत ते बोलत होते.
आत्महत्या ही जागतिक समस्या - मध्य प्रदेशच्या कृषिमंत्र्यांचे वक्तव्य : म्हणे शेतकऱ्यांशी संबंध नाही 

भोपाळ : आत्महत्या ही जागतिक समस्या आहे. उद्योगपतींपासून पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत सारेच जण आत्महत्या करतात. जो आत्महत्या करतो त्यालाच आत्महत्येचे कारण माहीत असते, असे विधान मध्य प्रदेशचे कृषिमंत्री बाळकृष्ण पाटिदार यांनी केले आहे. मध्य प्रदेशात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत ते बोलत होते. 

वाढत्या शेतकरी आत्महत्येसंदर्भात बोलताना पाटिदार म्हणाले, की आत्महत्या हा काही फक्त शेतकऱ्यांशीच संबंधित प्रश्न नाही. ही जगभरातील समस्या असून, शेतकरीच नव्हे, तर उद्योगपती, पोलिस अधिकारीही आत्महत्या करीत असतात. जो व्यक्ती आत्महत्या करतो, त्यालाच आत्महत्येचे कारण ठाऊक असते. मात्र, इतर लोक उगीचच आत्महत्येच्या कारणांची चर्चा करीत बसतात. आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणि सवलती जाहीर करीत असताना पाटिदार यांच्या वरील वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

21 टक्‍क्‍यांनी वाढल्या शेतकरी आत्महत्या 
मध्य प्रदेशातील शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात 2013 पासून 21 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती मागील महिन्यातच केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी संसदेत दिली होती. वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर 2017मध्ये मध्य प्रदेशात शेतकरी आंदोलनाचा मोठा भडका उडाला होता. त्या वेळी मंदसौरमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात पाच शेतकऱ्यांचा गोळीबारात मृत्यू झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com