लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची काँग्रेसला धोबीपछाड

लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसने काँग्रेसला धोबीपछाड दिल्याचे संकेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे रमेश कराड यांना आज राष्ट्रवादीत प्रवेश देत त्यांची उमेदवारी जाहीर केली जाणार आहे.
लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीची काँग्रेसला धोबीपछाड

मुंबई - लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसने काँग्रेसला धोबीपछाड दिल्याचे संकेत आहेत. भारतीय जनता पक्षाचे रमेश कराड यांना आज राष्ट्रवादीत प्रवेश देत त्यांची उमेदवारी जाहीर केली जाणार आहे. 

रमेश कराड हे शिक्षणसम्राट विश्वनाथ कराड यांचे पुतणे आहेत. या विधानपरिषद मतदारसंघातून ते भाजपच्या वतीने लढण्यास इच्छुक होते. मात्र त्यांच्या उमेदवारीची दखल घेतली नसल्याने त्यांनी थेट राष्ट्रवादीची वाट धरली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. 

रमेश कराड हे वंजारी समाजाचे आहेत. त्यातच या तिन्ही जिल्ह्यात वंजारी समाजाची मते लोकसभा व विधानसभेसाठीही निर्णायक मानली जातात. एक मोठा समाज या निमित्ताने राष्ट्रवादीसोबत जोडला जाण्याची शक्यता असल्याने काँग्रेसची जागा ओढून घेण्यास राष्ट्रवादीने पसंती दिल्याची चर्चा आहे. 

राष्ट्रवादीच्या या एकतर्फी भूमिकेमुळे विधानपरिषदेच्या सहा व लोकसभेच्या दोन पोटनिवडणूक होणाऱ्या मतदारसंघात आघाडी धर्म पेचात सापण्याचे संकेत आहेत. रमेश कराड यांचा आजच राष्ट्रवादीत प्रवेश होत असून उद्या ते विधानपरिषदेची उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीने नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघात अशाच पद्धतीने गेल्यावेळी ईश्वर चिठ्ठीमध्ये पराभूत झालेले, शिवेसेनेने अलिकडेच हकालपट्टी केलेले व भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे शिवाजी सहाणे यांना पक्षात घेऊन तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com