धनगर नेत्यांना डावलून आरक्षणासाठी आंदोलन : बारामतीच्या क्रांतीसेनेच्या महिलांनी नागपुरात केले जागरण

धनगरांना आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. या नेत्यांनी धनगर समाजाला फसविल्याची भावना असल्याने या नेत्यांना बाजूला करून क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात आरक्षणासाठी जागरण व गोंधळ घातला.
धनगर नेत्यांना डावलून आरक्षणासाठी आंदोलन : बारामतीच्या क्रांतीसेनेच्या महिलांनी नागपुरात केले जागरण

नागपूर : धनगरांना आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. या नेत्यांनी धनगर समाजाला फसविल्याची भावना असल्याने या नेत्यांना बाजूला करून क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात आरक्षणासाठी जागरण व गोंधळ घातला.

बारामती येथील क्रांतीसेनेच्या प्रमुख कल्याणी वाघमोडे यांच्या नेतृत्वात जवळपास 200 कार्यकर्त्यांनी नागपुरातील संविधान चौकात निदर्शने केली. विशेष म्हणजे या आंदोलनात धनगरांचे नेते सामील झालेले नव्हते. 

दुग्धविकास मंत्री महादेवराव जानकर, खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह एकही नेत्याने या आंदोलनात सहभाग घेतला नाही. नागपुरातील संविधान चौकात सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरक्षणाची आठवण करून देण्यासाठी नागपुरात आंदोलन केल्याचे कल्याण वाघमोडे यांनी सांगितले. ''धनगर समाजाने महादेव जानकर व डॉ. विकास महात्मे यांना मोठे केले. समाजाच्या भरवशावर त्यांना सत्तेची पदे मिळाली. सत्तेत गेल्यानंतर मात्र या नेत्यांनी समाजाकडे पाठ फिरवली," असा आरोप वाघमोडे यांनी केला. 

नागपुरातील या आंदोलनात राज्यभरातून 200 महिला व पुरुष कार्यकर्ते भर उन्हात जमा झाले होते. संविधान चौकात मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच आश्‍वासनाची आठवण करून देण्यात आली. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर लगेच धनगरांना आरक्षण देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांना या आश्‍वासनाची विसर पडल्याने त्याची आठवण करून देण्यासाठी नागपुरात हे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या गावात करण्यात आल्याचे आंदोलनाच्या नेत्यांनी सांगितले. धनगर आरक्षणासाठी यापुढील आंदोलन नेत्यांना डावलून केले जाईल तसेच समाजाशी द्रोह करणाऱ्यांना या आंदोलनात स्थान राहणार नसल्याचेही वाघमोडे यांनी स्पष्ट केले. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयात देण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com