मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोलिस व प्रशासनाची तारांबळ : मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांचा शोध सुरु

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोलिस व प्रशासनाची तारांबळ : मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांचा शोध सुरु

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्‍यातील शंकर चायरे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. दोन दिवसानंतरही मृतदेहाचे शवविच्छेदन झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. 12 एप्रिल) यवतमाळमध्ये असलेल्याने पोलिस व प्रशासनाने मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांची शोधाशोध सुरू केली आहे.

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्‍यातील शंकर चायरे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. दोन दिवसानंतरही मृतदेहाचे शवविच्छेदन झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. 12 एप्रिल) यवतमाळमध्ये असलेल्याने पोलिस व प्रशासनाने मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांची शोधाशोध सुरू केली आहे.

बोंडअळीची नुकसान भरपाई न मिळणे व कर्जबाजारपणामुळे घाटंजी तालुक्‍यातील करणवाडी येथील शंकर चायरे याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत माझ्या आत्महत्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे लिहिले आहे. तसेच मृत शेतकऱ्याच्या मुलीनेही घाटंजी पोलिस ठाण्यात शेतकऱ्याच्या मृत्यूला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याची तक्रार दिली आहे. मृत शेतकरी शंकर चायरे याचे नातेवाईक गावात नाहीत. तसेच मृतदेहाचा ताबाही नातेवाईकांनी अद्याप घेतलेला नाही. यामुळे आता पोलिसांची धावपळ सुरू झालेली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, यवतमाळ अर्बन बॅंकेच्या उद्‌घाटनासाठी यवतमाळमध्ये येत आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने करणार असल्याचे समजते. या निदर्शनाची कुणकुण पोलिसांना लागल्यानंतर मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याची मोहिम सुरू झाली आहे. आत्महत्या केल्यानंतर प्रशासनाकडून कुणीही मृत शेतकऱ्याच्या घरी भेट दिली नाही. आता मुख्यमंत्री येणार असल्याने पोलिस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नातेवाईकांचा शोध घेऊन मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com