पोटनिवडणुकांमध्ये विदर्भातही भाजपला झटका

लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भरभरून मत देणाऱ्या विदर्भातील मतदारांनी पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला चांगलाच झटका दिला. पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये विदर्भात भाजपचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. यामुळे भाजपविरोधात लोकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या जिल्ह्यातच भाजपला पराभव पचवावा लागला आहे.
पोटनिवडणुकांमध्ये विदर्भातही भाजपला झटका

नागपूर : लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भरभरून मत देणाऱ्या विदर्भातील मतदारांनी पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला चांगलाच झटका दिला. पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांमध्ये विदर्भात भाजपचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. यामुळे भाजपविरोधात लोकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या जिल्ह्यातच भाजपला पराभव पचवावा लागला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या किरण मस्के यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. या पोटनिवडणुकीच्या निकालामुळे पंचायत समितीची सत्ता ठरणार होती. या निवडणुकीत काँग्रेस विजयी झाल्याने आरमोरी पंचायत समितीची सत्ता राखण्यात काँग्रेसला यश मिळाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस नेते फारसे प्रभावी नसतानाही पक्षाने बाजी मारल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये धुगधुगी आली आहे. माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली.

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत भाजपला झटका बसला. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार रंजिता अगादारी विजयी झाल्या. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यात भाजप पराभूत झाल्याने हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांचे मूळ गाव घुग्घुस आहे. यामुळे या पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला बसलेला धक्का मोठा मानला जात आहे. एवढेच नव्हे तर या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेला. दुसऱ्या क्रमाकांची मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली. 

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंजू शंकर डोंगवार विजयी झाल्या. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मतदारसंघात ही पोटनिवडणूक झाली आहे. या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. या तिन्ही पंचायत समितीच्या पोटनिवडणुका भाजप आमदाराच्या मतदारसंघात झाल्या आहेत, हे विशेष.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com