मुख्यमंत्री फडणवीस संभाजी भिडेंचे आंधळे भक्त : अशोक सोनोने

''काेरेगाव भीमा दंगलीतील मास्टर माईंड संभाजी भिडे यांना अटक न करता राज्य सरकार त्यांना पाठिशी घालत अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच संभाजी भिडे यांचे आंधळे भक्त आहेत. त्यामुळे भिडे गुन्हेगार असतांना ही मोकाट आहे, त्यास त्वरीत अटक करावी अन्यथा राज्यभर आंदोलने होतील, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंबेडकरी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये,'' असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस संभाजी भिडेंचे आंधळे भक्त : अशोक सोनोने

खामगाव : ''काेरेगाव भीमा दंगलीतील मास्टर माईंड संभाजी भिडे यांना अटक न करता राज्य सरकार त्यांना पाठिशी घालत अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच संभाजी भिडे यांचे आंधळे भक्त आहेत. त्यामुळे भिडे गुन्हेगार असतांना ही मोकाट आहे, त्यास त्वरीत अटक करावी अन्यथा राज्यभर आंदोलने होतील, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंबेडकरी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये,'' असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी दिला आहे. 

अशोक सोनोने म्हणाले, ''कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी न्यायालयाने जामीन फेटाळला असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी मिलिंद एकबोटे यास अटक केली. मात्र, गुन्हा दाखल होवून 40 दिवस झाले तरी संभाजी भिडेंना अटक करण्यात आलेली नाही. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणाचा खरा सूत्रधार संभाजी भिडे असून जाती धर्माच्या नावावर तरुणांची माथी भडकविण्याचे काम करीत आहे. शिवाजी महाराज, फुले शाहू आंबडेकर यांच्या विचारांचा वसा जपणाऱ्या महाराष्ट्र राज्यात संभाजी भिडे सारख्या अपप्रवृत्ती जातीय विष कालवत असल्याने कोरेगाव भीमा सारखे प्रकरण घडते.''
 
''या घटनेमागे मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे असल्याची माहिती अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लगेच दिली होती. मात्र, राज्य सरकारच्या दबावाखाली असलेली पोलिस यंत्रणा संभाजी भिडे यांना अटक करत नसल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच संभाजी भिडे यांचे आंधळे भक्त आहेत. त्यामुळे भिडे गुन्हेगार असतांना ही मोकाट आहे, त्यास त्वरीत अटक करावी अन्यथा राज्यभर आंदोलने होतील, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंबेडकरी जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये.'' असेही सोनोने म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com