आजचा वाढदिवस : आमदार आशीष देशमुख - Marathi Political News Ashish Deshmukh Birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : आमदार आशीष देशमुख

सरकारनामा ब्युरो
रविवार, 8 एप्रिल 2018

आजचा वाढदिवस - 8 एप्रील

शेतकरी व स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर पक्षाच्या चौकटीबाहेर मत व कृती केल्याने भाजपचे आमदार आशिष देशमुख सध्या चर्चेत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ व माजी मंत्री रणजित देशमुख यांचे सुपुत्र असलेले आशिष देशमुखांना घरातून राजकारणाचा वारसा मिळाला आहे.

 

शेतकरी व स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर पक्षाच्या चौकटीबाहेर मत व कृती केल्याने भाजपचे आमदार आशिष देशमुख सध्या चर्चेत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ व माजी मंत्री रणजित देशमुख यांचे सुपुत्र असलेले आशिष देशमुखांना घरातून राजकारणाचा वारसा मिळाला आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते सक्रिय राजकारणात आहेत. त्यांनी 2009 मध्ये सावनेर मतदारसंघातून भाजपतर्फे काँग्रेसचे सुनील केदार यांना लढत दिली होती. यात त्यांचा पराभव झाला. 2014 त्यांनी काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढविली. अनिल देशमुख हे त्यांचे काका आहेत. काही महिन्यांपूर्वी स्वतंत्र विदर्भ व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सरकार विरोधात वक्तव्य केल्याने ते पुन्हा चर्चेत आले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख